मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg boss marathi 4 : 'नाद करायचा नाय'; 2022 मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची Bigg Boss च्या घरात एन्ट्री

Bigg boss marathi 4 : 'नाद करायचा नाय'; 2022 मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची Bigg Boss च्या घरात एन्ट्री

किरण माने

किरण माने

२०२२ या वर्षात सगळ्यात जास्त वादग्रस्त राहिलेले कलाकार म्हणजे अभिनेते किरण माने. आता किरण माने बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 2 ऑक्टोबर :  2022 या वर्षात सगळ्यात जास्त वादग्रस्त राहिलेले कलाकार म्हणजे अभिनेते किरण माने.  आता  किरण माने बिग बॉस मराठीच्या  घरात सहभागी झाले आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेते किरण माने बिग बॉस मराठीच्या सीझन 4 मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असणार आहेत. अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांनी आपण राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला काहीही पूर्व सूचना न देता मालिकेत काढून टाकण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. त्यांनतर पत्रक जाहीर करत वाहिनीने किरण माने गैरवर्तवणूक करत होते. वारंवार सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस च्या घरातील स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट; जाणून घ्या कोण कोण सहभागी होणार

बिग बॉसच्या घरात सामील होताच किरण माने यांनी पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय कि, ''..माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडनार नाय ! मानूस हाय मी, माणसासारखा वागनार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करनार. खेळ हाय त्यो. स्विकारलाय तर जीव लावून खेळनार. ढिला पडनार नाय. हसनार, हसवनार, चिडनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर 'दिल से' करनार...ती निभावनार. एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडनार....गावाकडचा गडी हाय. शेतकरी कुटूंबातला. रानात फिरलेला, ढेकळं तुडवलेला. नदीत,विहिरीत पोहलेला. एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा जिवापाड प्रयत्न करावा लागनारंय दोस्तांनो.''

''शिवी' ! 'शिवी' हा आमच्या बोलीतला अविभाज्य भाग हाय. त्या शिव्यांचा अर्थ नस्तो डोक्यात. एक एक्सप्रेशन म्हनून ती बाहेर येती एवढंच. आवो आमी तर लै छोटी मान्सं, आमच्या पहाडासारख्या तुकोबारायाच्या अभंगातबी तुमाला शिव्या सापडत्याल. निव्वळ मनातली भडास व्यक्त करन्याचं साधन म्हनून शिवी येती तोंडात. पन त्याचा तिथं 'इश्यू' हुईल.. माझ्याविरूद्ध शस्त्र म्हनून वापर हुईल, हे म्हायतीय मला. कारन मी बी लै शिवराळ हाय. भांडताना मला त्या सवयीवर लगाम घालायला लागनार... ते करीन.'' मी बिग बाॅसच्या घरात केवळ या शो च्या 'फाॅरमॅट'चं पालन करून खेळनारा एक खेळाडू असेन. खेळाडू, एक अभिनेता म्हनूनच माझ्याकडं बघा आनि शो चा आनंद घ्या.''

कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर, किरण माने यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळात किरण एका दुकानात काम करायचे. लवकरच त्यांना समजलं की त्यांना अभिनेता व्हायचं आहे. किरण माने यांनी विविध मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आता किरण माने बिग बॉस गाजवायला सज्ज झाले आहेत.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment