Home /News /entertainment /

Bigg Boss OTT: ’कार अपघातात गमावलं होतं बॉयफ्रेंडला’; शमिता शेट्टीचा खुलासा

Bigg Boss OTT: ’कार अपघातात गमावलं होतं बॉयफ्रेंडला’; शमिता शेट्टीचा खुलासा

सध्या शमिता शेट्टी ‘बिग बॉस OTT’(Bigg Boss OTT) मध्ये दिसून येत आहे.

  मुंबई, 8 सप्टेंबर- अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आणि ‘मोह्बतें’ फेम अभिनेत्री शमिता शेट्टीने (Shamita Shetty) पहिल्यांदा आपलं दुःख जगासमोर मांडलं आहे. सध्या शमिता शेट्टी ‘बिग बॉस OTT’(Bigg Boss OTT) मध्ये दिसून येत आहे. यामध्ये तिच्यात आणि राकेश बापटमध्ये जवळीकता निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र या आठवड्यात या दोघांमध्ये वादविवाद पाहायला मिळालं. दरम्यान शमिताने आपली प्रतिस्पर्धक असणाऱ्या नेहा भसीनजवळ आपलं दुःख व्यक्त केलं आहे. शमिताने पहिल्यांदा खुलासा करत म्हटलं आहे, तिने आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडला एका कार अपघातात गमावलं होतं. त्यामुळे ती इतकी हळवी झाली आहे. (हे वाचा: पवनदीप-अरुणिता KBC मध्ये लावणार हजेरी; VIDEO होतोय VIRAL) ‘बिग बॉस OTT’ च्या घरात निशांत भट्ट आणि प्रतिक सहेजपालने वारंवार हा मुद्दा उठवला आहे, की शमिता राकेशला सतत डोमिनेट करते. हा मुद्दा ऐकून शमिता खुपचं भडकली होती. तिला जास्त या गोष्टीचं दुःख होतं, की ही गोष्ट ऐकून राकेशने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लाइव्ह अपडेटमध्ये नुकताच शमिता घरामध्ये नेहा भसीनसोबत बोलताना दिसून आली.
  View this post on Instagram

  A post shared by Voot (@voot)

  यावेळी शमिताने आपण इतकं संवेदनशील का असल्याचं कारण सांगितलं आहे. शमिता म्हणाली, ‘मी इतकी हळवी बनले आहे, कारण मी खूपच कमी वयात माझ्या बॉयफ्रेंडला गमावलं होतं. त्यावेळी मी फक्त 18 वर्षांची होते. आणि मी माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडला एका कार अपघातात गमावलं होतं’. (हे वाचा:धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास  ) तसेच ती पुढे म्हणाली, ‘हेच कारण होतं की, इतक्या वर्षांपासून मी माझ्या आयुष्यात कोणालाही यायला दिलं नव्हत. मात्र राकेश मला चांगला व्यक्ती वाटला. म्हणून मी त्याच्याशी इतकी जवळीकता वाढवली होती’. तसेच नेहाने तिला समजावण्याचा प्रयत्नही केला, की राकेशने या 4 आठवड्यांत प्रत्येकवेळी तिला साथ दिली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg Boss OTT

  पुढील बातम्या