Home /News /entertainment /

Bigg Boss OTT Finale Winner : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस OTT ची विजेती

Bigg Boss OTT Finale Winner : दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस OTT ची विजेती

6 आठवड्यांपूर्वी सुरू झालेलं बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) चा ग्रँड फिनाले (Bigg Boss OTT Grand Finale) आज (18 सप्टेंबर) पार पडला.

    मुंबई, 18 सप्टेंबर : 6 आठवड्यांपूर्वी सुरू झालेलं बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) चा ग्रँड फिनाले (Bigg Boss OTT Grand Finale) आज (18 सप्टेंबर) पार पडला. जेथे सर्व स्पर्धकांना मागे टाकत दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) विजेती ठरली आहे. बिग बॉस ओटीटी करण जोहर होस्ट करीत होता आणि अंतिम महासोहळ्यात दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट, राकेश बापट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल यांच्यामध्ये टक्कर होती. विजेत्याला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. दिव्याने शो जिंकला असून निशांत फर्स्ट आणि शमिता सेकेंड रनर अप ठरली आहे. गौहरने दिव्याला शुभेच्छा देत ट्विट देखील केलं आहे. (Bigg Boss OTT winner Divya Agarwal) केव्हा झाली होती बिग बॉस ओटीटीची सुरुवात.. 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता बिग बॉस ओटीटीची सुरुवात केली होती. गेल्या अनेक सीजनमध्ये सलमान खान हा शो होस्ट करीत होता. तर बिग बॉस ओटीटी करण जोहरने होस्ट केला होता. प्रत्येक रविवारी वार एपिसोडमध्ये करण जोहर 8 वाजता येत होता. तर बाकी 6 दिवस एपिसोड्स सायकांळी 7 वाजता टेलिकास्ट होत होता. हे ही वाचा-Bigg Boss Marathi 3 : एक लोककलेची राणी आणि दुसरी अदांची खाण; यांना ओळखलं का? कोण कोण होतं या स्पर्धेत बिग बॉस ओटीटीमध्ये एकूण 13 कंटेस्टेंट्स होते. यामध्ये राकेश बापट, जीशान खान, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भसीन, मूस जटाना, अक्षरा सिंह, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित होते. कोण कधी झालं एलिमिनेट बिग बॉस ओटीटीअंतर्गत पहिल्या आठवड्यात उर्फी जावेद शोमधून बाहेर गेले होते. यानंतर करण नाथ आणि रिद्धिमाचा प्रवास थांबला होता. तर जीशानला नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बेघर करण्यात आलं होतं. त्यानंतर मिलिंद गाबा, अक्षरा सिंह आणि नेहा भसीन शोच्या बाहेर गेले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Big boss, Bigg Boss OTT, Bollywood actor

    पुढील बातम्या