Home /News /entertainment /

Video : कपडे घालायचे सोडून उर्फी जावेदवे शरीरावर चिकटवले फोटो अन् मग केलं असं काही..

Video : कपडे घालायचे सोडून उर्फी जावेदवे शरीरावर चिकटवले फोटो अन् मग केलं असं काही..

अतरंगी कपडे पाहून अनेकादा उर्फी जावेदला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. आता उर्फीनं पुन्हा एक नवीन लुक केला आहे ज्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे.

  मुंबई, 29 मार्च- उर्फी जावेद (Urfi Javed )नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे अतरंगी कपडे पाहून अनेकादा उर्फीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. आता उर्फीनं पुन्हा एक नवीन लुक केला आहे ज्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिचा हा नवीन लुक (Urfi Javed Bold Video ) पाहून तुमचाच तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद नेहमीच्या तिच्या (Urfi Javed Without Clothes video) फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील तिनं असाच काही व्हिडिओ तिच्या इन्स्टाला शेअर केला आहे. यावेळी तर तिनं कहर केला आहे. उर्फीनं तिच्या शरीरावर फक्त फोटो चिकटवून तिचा नवीन लुक क्रिएट केला आहे. तिचा हा नवीन लुक पाहिल्यानंतर लक्षात येते की, तिनं तिच्या शरीरावर दुसऱ्या कुणाचे नाही तर तिचेच फोटो चिकटवले आहेत. विशेष म्हणजे तिनं तिच्या या नवीन ड्रेसमध्ये डान्स देखील केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. वाचा-जेव्हा मायरा शूटवेळी 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग शिकवते.. क्यूट video viral उर्फीने तिचा हटके लुक शेअर करत म्हटलं आहे की, ही कल्पना मला इंटरनेटवर पाहून सूचली. मी ती क्रिएट करू इच्छित होते आणि ती मी क्रिएट केली.उर्फीचा हा लुक पाहून एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ही काय स्टाईल आहे? तर अन्य एकाने म्हटलं आहे की, फोटो फ्रेम बनून कुठे फिरत आहेस.  अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओवर येत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Urrfii (@urf7i)

  उर्फीनं तिच्या या लुकसाठी खास मेकअप देखील केला आहे तिनं ब्राऊन ग्लॉसी लिपस्टिक, लाईट आयशाडो, आईलायनर आणि मस्कारा देखील लावला आहे. यासोबतच तिनं केस देखील कर्ली केले आहेत. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. काही नेटकऱ्यांनी तिला या लुकवरून ट्रोल देखील केलं आहे. उर्फी फिटनेसकडे देते खूप लक्ष उर्फी जावेद तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. ‘डेढ़ी-मेढ़ी फैमली’ या टीव्ही शोमधून तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. वाचा-PHOTOS: एकमकमेकांच्या डोळ्यात हरवले आर्ची-परश्या, पाहून युजर्स म्हणाले... उर्फी जावेद मुळची युपीची.. उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. तिने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या टीव्ही शोमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासह तिने 'चंद्र नंदनी', 'सात फेरे की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जिजी माँ', 'दयान', 'ये रिश्ता क्या कहलाता है', यामध्ये काम केले आहे . त्यानंतर ती पुन्हा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली व चर्चेत देखील आली.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या