• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Urfi Javed ची ब्रालेट घालून अजब डिमांड; नेटकऱ्यांनी दिला असा रिप्लाय...

Urfi Javed ची ब्रालेट घालून अजब डिमांड; नेटकऱ्यांनी दिला असा रिप्लाय...

उर्फीच्या विचित्र फॅशनने सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली आहे. उर्फी जावेदने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हो फोटो पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर- टीव्ही जगातातील सर्वात लोकप्रिया आणि वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसला (Bigg Boss) ओळखलं जातं. यात सहभागी झालेले सेलेब्स देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात.'बिग बॉस ओटीटी'ची (Bigg Boss OTT) स्पर्धक उर्फी जावेद (Urfi Javed) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही सतत आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. जेव्हापासून ती या शोचा भाग बनली आहे, तेव्हापासून ती तिच्या हॉट स्टाईलने सोशल मीडियाचा पारा वाढवत असते. आता पुन्हा एकदा उर्फीच्या विचित्र फॅशनने सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली आहे. उर्फी जावेदने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हो फोटो पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. या फोटोत उर्फीनं अॅनिमल प्रिंटचा ब्रॅलेट आणि कमरेवर त्याच प्रिंटचा स्कार्फ गुंडाळालेली दिसत आहे. या आउटफिटमध्ये उर्फीची परफेक्ट फिगर दिसत आहे. या ब्रॅलेटला मध्ये एक रिंगने अॅडजेस्ट केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Urfi (@urf7i)

  उर्फी जावेद या फोटोत बीच लुकमध्ये दिसत आहे. तसेच, तिनं या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला गोव्याला जायचे आहे, ऑलवेज अ बीच बेबी'. या पुढे उर्फीने लिहिले आहे की, 'कमेंटमध्ये तुमचे आवडते बीच डेस्टिनेशन लिहा.' यावर नेटकऱ्यांनी कॉमेंट्समध्ये गोवा, मालदीव, बालीची नावे लिहिली आहेत. मात्र काहींनी मात्र पुन्हा एकदा तिच्या शॉर्ट कपड्यांवर तिला ट्रोल केले आहे. एकाने लिहिले आहे की, अजून लहान कपडे नाहीत का? तर दुसऱ्याने लिहिले आहे की, लहान कपडे घालून नाव कमावत आहे. वाचा :ग्लॅमर जगताचा निरोप घेण्यामागे काय होत खरं कारण?; भाग्यश्रीने केला खुलासा काही दिवसापूर्वी उर्फी जावेदने त्याच्या इन्स्टावर बॅकलेस टॉपमधील काही फोटो पोस्ट केले होते. उर्फीने अतिशय स्टायलिश बॅकलेस टॉप परिधान केल्याचे या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. याच फोटोमध्ये ती पाठ दाखवताना दिसत आहे. वाचा :अमिताभ बच्चन यांच्या Family Photo मध्ये दिसली ही पेंटिग; होतेय मोठी चर्चा उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. तिने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या टीव्ही शोमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासह तिने 'चंद्र नंदनी', 'सात फेरे की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जिजी माँ', 'दयान', 'ये रिश्ता क्या कहलाता है', यामध्ये काम केले आहे . त्यानंतर ती पुन्हा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली व चर्चेत देखील आली.
  Published by:News18 Trending Desk
  First published: