मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shamita Shetty आणि Rakesh Bapat ची डिनर डेट; जोडीचा रोमँटिक व्हिडीओ होतोय VIRAL

Shamita Shetty आणि Rakesh Bapat ची डिनर डेट; जोडीचा रोमँटिक व्हिडीओ होतोय VIRAL

'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) चा पहिला सीजन बिग बॉस इतकाच धमाकेदार ठरला. यामध्येसुद्धा अनेक वादविवाद, धमाके पाहायला मिळाले.

'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) चा पहिला सीजन बिग बॉस इतकाच धमाकेदार ठरला. यामध्येसुद्धा अनेक वादविवाद, धमाके पाहायला मिळाले.

'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) चा पहिला सीजन बिग बॉस इतकाच धमाकेदार ठरला. यामध्येसुद्धा अनेक वादविवाद, धमाके पाहायला मिळाले.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 सप्टेंबर- 'बिग बॉस OTT'(Bigg Boss OTT) चा पहिला सीजन बिग बॉस इतकाच धमाकेदार ठरला. यामध्येसुद्धा अनेक वादविवाद, धमाके पाहायला मिळाले. दरम्यान बिग बॉसच्या घरात एक जोडी खूपच जवळ आल्याचं दिसली. ती जोडी म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) होय. राकेश आणि शमिता ही या सीजनची सर्वात लोकप्रिय जोडी ठरली. या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्त जास्त काही असल्याचं सर्वानांच जाणवलं होतं. या दोघांनी बोलण्या-बोलण्यातून अनेकवेळा एकेमकांना पसंत करत असल्याचा इशाराही दिला होता. दरम्यान शोनंतर हे दोघे एका डिनर डेटवर(Dinner Date) पोहोचले आहेत.

'बिग बॉस' या लोकप्रिय आणि तितक्याच विवादीत शोमध्ये अनेक जोड्या बनल्याचं आपण पाहिलं आहे. अनेकांनी या घरात आपला जोडीदार निवडला आहे. यावेळी 'बिग बॉस OTT'च्या पहिल्या पर्वातसुद्धा असच काहीसं पाहायला मिळालं होतं. या पर्वात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांच्यात जास्त जवळीक निर्माण झाली होती. हे दोघे घरामध्ये नेहमी एकमेकांसोबत दिसून येत होते. राकेशने आपल्याला शमिता पसंत असल्याचंहि म्हटलं होतं. तर शमिताने अनेकवेळा राकेशला पसंती दाखवली होती. सर्वांना हे या शोसाठी मर्यादित वाटलं होतं, मात्र याविरुद्ध झालं. शोमध्येच राकेशने घराबाहेर गेल्यानंतर आपण शमिताला भेटू असं म्हटलं होतं. त्यानुसार नुकताच राकेश बापट आणि शमिता शेट्टी डिनर डेटसाठी एकत्र आले होते.

(हे वाचा:BB OTT: पाहा कोणाचे किती आहेत इन्स्टाग्राम फॉलोअर्स?; कोण आहे ... )

विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी एकेमकांच्या हातात हात देऊन मीडियाला पोज देताना दिसून आले. हे दोघेही एका डिनर डेटसाठी पोहोचले होते. राकेश आणि शमिता एकमेकांसोबत खूपच खुश दिसत होते. दोघेही मीडियाला अगदी आनंदाने पोज देत होते. त्यामुळे या दोघांच्यात नक्कीच काहीतरी  शिजत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकवेळा काही जोड्या बिग बॉसच्या घरासाठी मर्यादित राहतात. तर काही जोड्यांनी लग्न करत सर्वांना चकित केलं आहे. शमिता आणि राकेश बिग बॉसच्या घरामध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. राकेशने बिग बॉसच्या घरात आपण शमिताला पसंत करत असल्याचंही कबूल केलं होतं. तर शमितानेही अनेकवेळा नकळत राकेशवर प्रेम जाहीर केलं होतं. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता होती. की ही जोडी घरासाठी आहे, की घराबाहेरही यांच्यात काही घडेल. मात्र आज या दोघांना डिनर डेटवर पाहून सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

(हे वाचा:BB OTT: शमिता शेट्टीने कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल केला धक्कादायक ... )

बिग बॉस OTT मध्ये राकेश आणि शमिता नेहमीच एकत्र असायचे. या दोघांनी प्रत्येक परिस्थिती एकेमकांना साथ दिली होती.एका टास्क दरम्यान राकेशने शमितासाठी आपल्या आईचं पत्रदेखील फाडून टाकलं होतं. दोघेही घरात एकमेकांना समजून घेताना दिसले होते. मात्र घरातील स्पर्धक आणि बिग बॉस OTT विजेती दिव्या अग्रवालवरून या दोघांमध्ये वादावादी झाली होती.

First published:

Tags: Bigg Boss OTT, Entertainment