मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

उट सूट ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची इन्स्टावर मोठी कामगिरी, चाहत्यांचे मानले आभार

उट सूट ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची इन्स्टावर मोठी कामगिरी, चाहत्यांचे मानले आभार

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद( bigg boss ott fame actress urfi javed) सोशल मीडियावर सेंसेशन बनली आहे.

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद( bigg boss ott fame actress urfi javed) सोशल मीडियावर सेंसेशन बनली आहे.

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद( bigg boss ott fame actress urfi javed) सोशल मीडियावर सेंसेशन बनली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 11 डिसेंबर: बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद( bigg boss ott fame actress urfi javed) सोशल मीडियावर सेंसेशन बनली आहे. उर्फी जावेद तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. उर्फी जावेदला यामुळे अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे. पण यानंतरही उर्फी तिचा आत्मविश्वास कमी होऊ देत नाही आणि वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच उर्फी जावेदचे (urfi javed instagram) इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. याबद्दल उर्फीने आनंदही व्यक्त केला आहे. उर्फीने चाहत्यांचे मानले आभार उर्फी जावेदने इन्स्टावर 2 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. यानंतर तिनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी म्हणताना दिसत आहे की, व्वा ! इन्स्टावर 2 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याकडून सर्व चाहत्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदने पिवळ्या रंगाचा ब्रॅलेट परिधान केला आहे. यासोबत एक पोस्ट देखील केली आहे ज्यामध्ये ती चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे. वाचा : राखीने पती रितेशसोबत प्रेक्षकांना मूर्खात काढलं? नेटकऱ्यांनी सत्य आणलं समोर अभिनेत्री उर्फी जावेद पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने बिग बॉस ओटीटी या टीव्ही शोमध्ये भाग घेतला. तिच्या चुलबुल्या अंदाजामुळे तिनं एक फॅन फॉलोइंग देखील तयार केली. पण आता ही अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. अशा परिस्थितीत उर्फीची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीमध्ये जास्त काळ राहू शकली नाही. उर्फी बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक होती.
View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने नुकतेच शेअर केले होते ब्लू बिकिनीमध्ये फोटो उर्फीच्या रुटीनमध्ये तिचे बोल्ड फोटो पोस्ट करणे समाविष्ट आहे. ती दररोज वेगवेगळ्या कपड्यांमध्ये फोटो शेअर करते. नुकतेच तिने ब्लू बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी बीच बेबी आहे.' उर्फी जावेदने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या डान्स मूव्ह्सने चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे.
First published:

Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Entertainment, Tv actress

पुढील बातम्या