मुंबई, 24 एप्रिल- 'बिग बॉस ओटीटी'
(Bigg Boss OTT) मुळे प्रसिद्धीझोतात आलेली स्पर्धक म्हणजे उर्फी जावेद
(Urfi Javed) होय. उर्फी आपल्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सतत चर्चेत असते. ती कधी कॉटन कँडीपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसते, तर कधी सेफ्टी पिनने बनवलेल्या ड्रेसमध्ये तर कधी तिने पॉलिथिनपासून बनवलेले ड्रेस परिधान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आता उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या विचित्र लुकमुळे चर्चेत आली आहे.यावेळी तिने नेमकं काय परिधान केलंय पाहूया.
उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर येताच सर्वच थक्क झाले आहेत. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारणही तसंच आहे. उर्फी जावेदने यावेळी बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. तिने आपल्या शरीरावर फक्त रंगीबेरंही फुले चिकटवली आहेत.या हटके अंदाजात एक रील उर्फीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ समोर येताच तो चर्चेचा विषय बनला आहे.
उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर आपल्या अतरंगी लुकमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे ट्रोलदेखील होत असते. परंतु या सर्वाचा उर्फीवर अजिबात परिणाम होत नाही. ती नेहमीच आपल्या अंदाजात वावरत असते.आजही असंच काहीसं झालं आहे. आज उर्फीला पाहून अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. अनेकांनी तिला कमेंट्स करत हद्द झाल्याचं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी उर्वी जावेदने जो ड्रेस परिधान केला होता. तो चक्क कॉटन कँडीपासून बनविण्यात आला होता. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या कॉटन कँडीपासून बनलेला ड्रेस घातलेला होता. इतकंच नव्हे तर ती या ड्रेसमधील कॉटन कँडी काढून खात देखील होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.