मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली; Bigg Boss OTT वर स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली; Bigg Boss OTT वर स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते याची वाट पाहत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते याची वाट पाहत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते याची वाट पाहत होते.

  मुंबई, 8 ऑगस्ट : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू झालं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर (Voot app) हा शो पाहिला जाणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज सकाळपासून सोशल मीडियावर हा शोचीच चर्चा सुरू होती. महत्त्वाची बाब म्हणजे करण जोहर (Karan Johar) या शोला होस्ट करत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांची ओळख करून देण्यात आली. बिग बॉसचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यात आता बिग बॉस थेट ओटीटी वूटवर पाहायला मिळणार असल्यामुळे अगदी मोबाइलमधून कधीही चाहते त्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. झीशान खान, राकेश बापट, मिलिंद गाबा, निशांत भट, करण नाथ, प्रतीक सीहजपाल यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

  Big Boss OTT: कार्निव्हल थीमने सजलं बिग बॉसचं घर; पाहा INSIDE PHOTOS

  याशिवाय बिग बॉसच्या घराचे आतील फोटो याआधीच समोर आले होते. यावेळी अतिशय सुंदर आणि आगळं वेगळं असं घर सजवण्यात आलं आहे. कर बोहेमियान आणि कार्निव्हल थीममध्ये ते सजवण्यात आलं आहे. घरात लहानसा स्विमिंगपूल ते गार्डन सगळंकाही आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Bollywood, Entertainment, Karan Johar

  पुढील बातम्या