मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB OTT: शमिताला लागलीय शिल्पाची चिंता; घरात येताच नियाला विचारलं...

BB OTT: शमिताला लागलीय शिल्पाची चिंता; घरात येताच नियाला विचारलं...

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होत होती.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 2सप्टेंबर- बिग बॉस OTT (Bigg Boss OTT) दर्शकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. यामध्ये दररोज काही ना काही इंटरेस्टिंग घडत असतं. नुकताच BB हाऊसमध्ये छोट्या पडद्यावरील बोल्ड क्वीन निया शर्माने एन्ट्री(Nia Sharma Entry) घेतली आहे. निया या शोची वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे. ती आता बिग बॉसच्या घरात आपलं मनोरंजन करताना दिसून येणार आहे. घरात येताच निया सर्व स्पर्धकांमध्ये मिसळून गेली आहे. सर्व स्पर्धक तिला विविध प्रश्न करताना दिसून आले. यावेळी अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) बिग बॉसच्या घराबाहेर चाललेल्या घडामोडींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच तिला आपली बहीण शिल्पा शेट्टीबद्दल जाणून घ्यायचं होतं. राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसमुळे सध्या ती अडचणीत आहे. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होत होती. अशा कठीण काळात तिला आपल्या बहिणीला एकट सोडून कुठंही जायचं नव्हतं. मात्र आपल्या कमिटमेंटमुळे तिला बिग बॉसमध्ये सहभागी व्हावं लागलं होतं. शमिताने इशाऱ्यांमध्ये निया शर्माला बाहेर सर्वकाही ठीक आहे ना? असा प्रश्न केला, मात्र नियाने उत्तर दिलं हा सर्वकाही ठीक आहे, शोमध्ये यायच्या आधी मला तर कोणाच्या मृत्यूची बातमी नाही मिळाली. यावर शमिताने म्हटलं मी माझ्याबाबतीत विचारत आहे’. (हे वाचा: वरूण ते विकी कौशल Sidharth Shuklaच्या एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का) शमितानं इतकं विचारूनसुद्धा नियाला लक्षात नाही आलं की ती कशाबद्दल विचारत आहे. सांगायचं झालं तर या शोची पॉलिसी आहे की कोणतीही बाहेरची चर्चा याठिकाणी करायची नाही. त्यामुळे शमिताला थेट शिल्पाबद्दल विचारता येत नव्हतं.
First published:

Tags: Bigg Boss OTT

पुढील बातम्या