'बिग बॉस चाहते हैं... पडद्यामागच्या आवाजामागचा 'हा' आहे खरा चेहरा

'बिग बॉस चाहते हैं... पडद्यामागच्या आवाजामागचा 'हा' आहे खरा चेहरा

बिग बॉसच्या घरात पडद्यामागून येणारा आवाज नेमका कुणाचा? पडद्यामागून येणाऱ्या या आवाजाचा चेहरा कोण ? याबद्दल प्रेक्षकांना कुतूहल आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मध्ये नेहमीच एक वजनदार आवाज सर्वांनी ऐकला आहे 'बिग बॉस चाहते हैं की...' आणि हा आवाज ऐकल्यावर घरातील सर्वजण आपल्या हातातलं काम टाकून बिग बॉसच्या सूचना ऐकत असल्याचं आपण पाहतो. कधी कधी हा आवाज आदेश देतो तर कधी स्पर्धकांना सज्जड दमही भरतो. मात्र हा आवाज नेमका कुणाचा ? पडद्यामागून येणाऱ्या या आवाजाचा चेहरा कोण ? हे प्रश्न नेहमीच प्रेक्षकांना सतावतात. पण आता या रहस्यमय आवाजावरील पडदा उठला आहे. या मजबूत आवाजच्या माणसाचं नाव आहे विजय विक्रम सिंह. जेवढा त्यांचा आवाज भरदस्त वाटतो तसं त्यांचं व्यक्तिमत्वही त्याच्या आवाजाला साजेसं आहे.

विजय विक्रम सिंह मागच्या 9 वर्षापासून बिग बॉससाठी काम करत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात राहणारे विजय यांचं शिक्षण एमबीए पर्यंत झालं आहे. मनोरंजनाच्या दुनियेशी दूरदूरवर कोणतही नातं नसलेले विजय एकेकाळी 9 ते 6 असा जॉब करत असत. त्यांच्या आवाजाचं सगळीकडे खूप कौतुक व्हायचं पण त्यांना वाटायचं की फक्त गाणाऱ्या व्यक्तींचाच आवाज चांगला असतो आणि त्यांना गाणं अजिबात जमत नाही. त्यांना वाटायचं की त्यांच्या आवाजाचा काहीच फायदा नाही मात्र बिग बॉस शोनं त्यांना स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली.

आज बिग बॉस शोमुळे प्रत्येकजण त्यांच्या आवाजाचा चाहता आहे. मात्र आपल्या आवाजानं एवढी प्रसिद्धी मिळवणाऱ्या विजय यांच्यावर एकवेळ अशी आली होती की, ते मृत्यूच्या दारात उभे होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना डिप्रेशनचा सामना करावा लागला. 26 वर्षाचे असताना ते दारूच्या नशेत एवढे अडकले होते की त्यांच जगणं मुश्किल झालं होतं. मात्र प्रदीर्घ उपचारानंतर त्यांना पुन्हा एकदा आपल्या जीवनाला आकार देण्याची संधी मिळाली आणि विजय सिंहनी या संधीचं सोनं केलं.

2009 मध्ये विजय यांन पहिल्यांदा व्हॉईसओओव्हर आर्टिस्ट म्हणून काम मिळालं आणि त्यानंतर त्यांना एकामागोमाग एक नवे प्रोजेक्स मिळत गेले. त्यांनी जवळपास 250 रिअ‍ॅलिटी शो आणि 100पेक्षा जास्त जाहीरातींमध्ये व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. 9 वर्षांपूर्वी त्यांना बिग बॉससाठी नॅरेटरची ऑफर मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. या सर्व यशाचं श्रेय विजय त्यांची पत्नी गितांजलीला देतात. गीतांजली यांनी विजय यांच्या सामान्य व्यक्ती ते एक प्रसिद्ध व्हॉईस आर्टिस्ट पर्यंतच्या प्रवासात भक्कम साथ दिली आहे.

First published: April 13, 2019, 10:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading