मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /असं आहे BBM विजेता विशाल निकमचं गावाकडील घर! पाहा झक्कास VIDEO

असं आहे BBM विजेता विशाल निकमचं गावाकडील घर! पाहा झक्कास VIDEO

 बिग बॉस मराठीचा   (Bigg Boss Marathi)   तिसरा सीजन प्रचंड गाजला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल प्रचंड क्रेझ होती. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये विशाल निकमनं   (Vishal Nikam)  बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनची ट्रॉफी पटकावली  (BB Marathi Season 3 Winner)  आहे.

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) तिसरा सीजन प्रचंड गाजला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल प्रचंड क्रेझ होती. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये विशाल निकमनं (Vishal Nikam) बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनची ट्रॉफी पटकावली (BB Marathi Season 3 Winner) आहे.

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) तिसरा सीजन प्रचंड गाजला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल प्रचंड क्रेझ होती. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये विशाल निकमनं (Vishal Nikam) बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनची ट्रॉफी पटकावली (BB Marathi Season 3 Winner) आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 डिसेंबर-   बिग बॉस मराठीचा   (Bigg Boss Marathi)   तिसरा सीजन प्रचंड गाजला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल प्रचंड क्रेझ होती. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. यामध्ये विशाल निकमनं   (Vishal Nikam)  बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनची ट्रॉफी पटकावली  (BB Marathi Season 3 Winner)  आहे. विशालला सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला होता. या शोनंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. त्यामुळेच आज आपण विशाल निकमचं गावाकडील घर पाहणार आहोत.

विशाल निकम हा मराठी मालिकांमधील अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु बिग बॉस मराठीने त्याला एक विशेष ओळख निर्माण करून दिली आहे.बिग बॉसने  त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं आहे. त्याचा साधा-सरळ स्वभाव प्रेक्षकांना फारच भावून गेला. हा अभिनेता खऱ्या आयुष्यातसुद्धा तितकाच साधा आणि सिम्पल आहे. त्यामुळेच तो या रिऍलिटी शोमध्येसुद्धा तसेच पाहायला मिळाला. त्याला साधं राहणीमान आवडत. तो गावाकडचा रांगडा गडी आहे. शोमध्ये तो चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणत असे त्यामुळे तो चाहत्यांना फारच पसंत पडला होता.त्याच्या राहणीमात गावाकडचं प्रेम आणि आपुलकी दिसून येते.

" isDesktop="true" id="650500" >

विशाल निकमचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ त्याने बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यापूर्वी बनवला होता. या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये विशाल बुलेटवरून एन्ट्री करताना दिसत आहे. त्यांनतर तो आपल्याला आपल्या घराची ओळख करून देतो. त्याच्या गावाकडील घराचं नाव 'वृंदावन' असं आहे. या व्हिडीओमध्ये विशाल सांगत आहे, बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यांनतर मी सर्वात जास्त घरातील आईच्या हातच जेवण मिस करणार. यावरूनच कळत की हा व्हिडीओ त्याने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी बनवला होता. या व्हिडीओमध्ये विशाल अत्यंत साधेपणानं भोजन करताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतो 'घरातील जेवण भलेही साधं असो, परंतु या जेवणासारखी चव जगातील कोणत्याही जेवणाला नाही'. यावरूनच त्याचा साधेपणा दिसून येतो.

(हे वाचा:Bigg Boss Marathi 3: विशाल निकम जिंकलेल्या रक्कमेचे करणार 'हे' काम)

विशाल निकमचा जन्म १० फेब्रुवारीला देवखिंडी या गावात झाला होता. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. या गावात विशालचे हे सुंदर घर आहे. त्याचे आईवडील वडिलांच्या कामानिमित्त परराज्यात असतात. तर तो आपल्या कामानिमित्त मुंबईमध्ये असतो. विशालच  शिक्षण सांगलीत पूर्ण झालं होतं. तर  महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्याला गेला  होता. त्याने जोतिबा, साता जल्माच्या गाठी अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याला खरी ओळख बिग बॉस मराठीने मिळवून दिली आहे. बिग बॉस मराठीमुळे विशालला प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. याचीच पोचपावती म्हणून आज त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.  आता त्याच्या चाहत्यांना त्याच्या सौंदर्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे. शोमध्ये सोनालीसोबत त्याचं फार छान बॉन्डिंग झालं होतं. मात्र दरम्यान अनेक अशा गोष्टी घडल्या कि त्यांच्यात फूट पडली. मात्र विशालने आपण सोनालीला सुरुवातीपासूनच एक मैत्रीण समजत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment