नुकताच समोर आलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता विशाल निकम यांची भेट झालेली पाहायला मिळाली. बिग बॉसमध्ये स्नेहा आणि विशाल निकम दोघांचं नातं छान होतं.स्नेहा आणि विशाल अनेकवेळा विविध विषयांवर चर्चा करताना सुद्धा दिसले होते. शोमध्ये ते एकमेकांचा आदर करत असल्याचं दिसून आलं होतं. शोमधून बाहेर गेल्यातर स्नेहा गेस्ट म्हणून एक दिवसासाठी घरात परतली होती. त्यावेळी तिने विशाल निकमला तू उत्तम खेळत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय तिने काही हेल्थी टिप्ससुद्धा विशालला दिल्या होत्या. (हे वाचा:‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम रोहित आणि जुईलीच्या लग्नाचे UNSEEN फोटो) विशाल निकमने पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. साधा आणि स्पष्ट स्वभाव यामुळे तो प्रेक्षकांचा लाडका बनला होता. त्यामुळेच तो या पर्वाचा विजेतासुद्धा ठरला. शोमध्ये त्याची सोनाली पाटीलसोबत जवळीक निर्माण झाली होती. परंतु नंतर त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. यावेळी विशालने आपलं सौंदर्यावर प्रेम असल्याचं कबूल केलं होतं. तर दुसरीकडे स्नेहा आणि जयमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. परंतु शोमधून बाहेर गेल्यानंतर स्नेहाला जयच्या काही गोष्टी खटकल्या त्यामुळे तिने जयवर गेमसाठी आपला वापर करून घेतल्याचे आरोप केले होते. परंतु जय शोनंतर मी बाहेर भेटून सर्वकाही ठीक करणार असल्याचं म्हणाला होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.