मुंबई, 8 नोव्हेंबर: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3) नाती बदलताना दिसतं आहेत हे मात्र नक्की ! मीनल आणि विकासच्या मैत्रीमध्ये सुध्दा आता दुरावा येणार का ? असं कुठेतरी विकासच्या बोलण्यावरून वाटतं आहे. घरामध्ये कोण आहे बिच्छू गॅंग ज्याबद्दल विकास सोनालीशी बोलताना दिसणार आहे ? काल विशाल निकमला चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमध्ये त्याच्या फॅनने सोनालीबद्दल चुगली केली, ज्याचे विशालला जरा वाईट वाटले. पण,म्हणता म्हणता सोनाली नाही तर मीनलचं त्या ग्रुपसोबत जाऊन गप्पा मारताना दिसणार आहे. नक्की कशाचे विकासला वाईट वाटले आहे ? मीनलने खरंचं तिचा गेम सुरू केला आहे का ? नक्की काय सुरू आहे तिच्या डोक्यात हळूहळू कळेलच.
विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, हा हा हू हू चालू आहे मीनलचं... बिच्छू गॅंग बरोबर. सोनालीचे म्हणणे आहे, तिने तिचा गेम चालू केला असेल. तुला बोलली नाही का, सगळ्या गोष्टी. विकास पुढे म्हणाला, एंजॉय करूया असं म्हणाली याचा अर्थ हा होतो हे मला नव्हतं माहित. सोनाली त्यावर त्याला म्हणाली, तू पण जाऊन बसतोस की ? त्यावर विकास म्हणाला, असा ? इतका वेळ?... आणि मी बसतं नाही, लोकं माझ्याकडे येतात. हा फरक आहे.... कळलं...
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात दररोज नवीन समीकरण पाहायला मिळतात. घरात दोन ग्रुप पडले आहेत. प्रत्येक टास्कमध्ये ग्रुपचे सदस्य आपला कॅप्टन होण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळी काहींचे वाद होतात. यासोबतच आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर सर्वांची पोलखोल करताना दिसतात. काल तृप्ती देसाई घरातून बाहेर पडल्या आहेत. खेळ आता रंजक झाला आहे. प्रत्येकजण खेळात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत असतात.
वाचा : ‘न भूतो न भविष्यति’, Bigg Boss Marathi च्या घरात आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट
बघूया काय होतं पुढे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा दररोज रात्री कलर्स मराठीवर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Entertainment, Marathi entertainment