कोल्हापूर, 1 जानेवारी- बिग बॉस मराठी तीनचा (Bigg Boss Marathi 3) महाविजेता सांगलीचा विशाल निकम (BB Marathi Season 3 Winner) झाला आहे. विशाल निकम (Vishal Nikam) बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्या गावकऱ्यांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. यानंतर त्याने पंढरपूरला जात विठ्ठल- रूक्मिणीचे देखील दर्शन घेतले. यासोबतच त्याने किर्तनकार शिवलीला पाटीलची देखील भेट घेतली. सातत्याने त्याच्या भेटीगाठी सुरूच आहेत. त्याने आता संबंध महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोतिबाचे दर्शन घेतेले आहे. यावेळी त्याच्यासोबत विकास पाटील देखील होता. यानंतर या दोघांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे देखील दर्शन घेतले.
विशाल निकम आणि विकास पाटील या दोघांनी जोतिबाचे अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. या दोघांची मैत्री बिग बॉसच्या घऱात जमली. या दोघांच्या मैत्रिचे खूप कौतुक झाले. आता घऱातून बाहेर आल्यनंतर या दोघांनी मिळून जोतिबाचे दर्शन घेतले आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. यावेळी विशाल निकमने घोड्यावरून एक फेरफटका देखील मारला. त्याचे देखील फोटो समोर आले आहेत.
विशाल निकमने जोतिबा मालिकेत जोतिबाची भूमिका साकारली होती. या मालिकेने त्याला महाराष्ट्राच्या घराघऱात पोहचवले. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरातच झाल्याने विशालची नेहमीचा कोल्हापूरशी जवळीकता दिसते. आज त्याने जिंकल्यानंतर जोतिबाचे दर्शन घेतले आहे.
वाचा-Big News: 'जर्सी'फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण
विशाल निकमचा जन्म 10 फेब्रुवारीला देवखिंडी या गावात झाला होता. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. या गावात विशालचे हे सुंदर घर आहे. त्याचे आईवडील वडिलांच्या कामानिमित्त परराज्यात असतात. तर तो आपल्या कामानिमित्त मुंबईमध्ये असतो. विशालच शिक्षण सांगलीत पूर्ण झालं होतं. तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्याला गेला होता. त्याने जोतिबा, साता जल्माच्या गाठी अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याला खरी ओळख बिग बॉस मराठीने मिळवून दिली आहे. बिग बॉस मराठीमुळे विशालला प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. याचीच पोचपावती म्हणून त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment, TV serials