मुंबई 1 डिसेंबर: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फारच रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता घरामध्ये फक्त ८ स्पर्धक राहिले आहेत. आणि ग्रँड फिनालेसाठी फक्त चार आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक आपली जागा बनवण्यासाठी लढत आहे. त्यामुळे सर्व स्पर्धक आपल्या मित्र-मैत्रिणींच्या विरुद्ध जात आपला गेम खेळत आहेत. दरम्यान विशाल आणि विकासमध्ये प्रचंड राडे पाहायला मिळाले होते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल (Vishal) आणि मीनलची (Meenal) आज चर्चा बघायला मिळणार आहे.
विशाल आई मीनल या चर्चेमध्ये कॅप्टन्सी टास्क आणि विकासबद्दल बोलताना दिसणार आहेत. घरातील सदस्यांची नाती दर दिवसाला बदलत आहेत. कोणजाणे उद्या गायत्री, मीरा आणि जयमधील अबोला देखील दूर होईल. या घरात एकमेकांची साथ ही लागतेच मग ते कार्य असो व टास्क असो. विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे, कॅप्टन्सी टास्कविषयी काय बोलत होती... की तू स्वत:साठी खेळ दुसर्यांसाठी नाही... आता बघ. मी विकासला हाच प्रश्न विचारला. May be त्याला तसं वाटला असेल, वाहिनीने तसं सांगितलं की कॅप्टन्सी मला द्या मला द्या म्हणू नका... मी त्याला बोलो काय बोल्या मला समजलं नाही, मला असं वाटलं की ती म्हणत होती कॅप्टन मला बनवा म्हणून तिकडे जाऊ नका म्हणून, ग्रुपमध्ये खेळताय तुम्ही एकमेकांसाठी खेळा, एकमेकांना बनवा... मी कधीतरी गेलो आहे का मला सांग? कधीचं नाही गेलो. हे त्यातून मला त्यात घेऊन चालला आहे... मग म्हंटल याला नको पुढचं विचारायला. हा मला एकाच दुसरं करून सांगणार… आता हे नेमकं काय आणि कोणत्या वेळेचं बोल्ट आहेत. ते आजच्या एपिसोडमध्ये समजेल.
(हे वाचा:'मी होणार सुपरस्टार' चा निरोप घेताना संस्कृती बालगुडे झाली भावुक; पोस्ट शेअर करत)
तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खूप दिवसांनी टीम B एकत्र बसून चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये एक,दोन दिवसांपासून अजून एक सदस्य भरती झाला आहे आणि ती सदस्य म्हणजे गायत्री दातार. विशाल आणि विकास एकमेकांशी ग्रुपसमोर चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये विकासने ग्रुपला एक विनंती देखील केली आणि त्यानंतर सगळ्यांना हसू फुटले. विशाल विकासला विचारताना दिसणार आहे, तू मला नॉमिनेट का करायला गेला होतास जयकडे ? विकास त्यावर म्हणाला, कारणं तू मला करत होतास. विशाल म्हणाला, मी तुझं नावं सुध्दा घेतला नाही. त्यावर विकास म्हणाला, मला जयने सांगितले.
(हे वाचा:'गँग्स ऑफ वासेपुर' फेम अभिनेत्याने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ)
मीनल म्हणाली, खोटं बोलतो. विशाल म्हणाला, खोटं बोलायला कुठल्या शाळेत..... विकास म्हणाला, त्याविषयी आपण कॅमेरा ऑफ होऊ देत मग बोलूया . विशाल म्हणाला, त्यानंतर जयने बॉम्ब टाकला तो मला नॉमिनेट करायला आला. भाऊ बोलायलाचं आला नाही परत. त्यावर विकास म्हणाला, आम्ही तीन दिवस वाट बघत होतो तू येशील आमच्याकडे सॉरी बोलायला. विकासचे म्हणणे आहे, इथून पुढचा गेम अवघड होत जाणार आहे. तर कोणालाही नॉमिनेट करा मला नॉमिनेट करू नका. हे ऐकताच सगळ्यांना हसू फुटले.आता पुन्हा हे मित्र एकत्र येणार कि पुन्हा त्यांच्यात फूट पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.