Bigg Boss Marathi 2- अन् मांजरेकरांनी वीणा- शिवानीवर थंड पाण्याचा वर्षाव केला

पूर्ण आठवड्यात कोणामुळे घरातील तापमान वाढले असा प्रश्न विचारला असता स्पर्धकांनी विणा आणि शिवानीचं नाव घेतलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 04:50 PM IST

Bigg Boss Marathi 2- अन् मांजरेकरांनी वीणा- शिवानीवर थंड पाण्याचा वर्षाव केला

लोणावळा, 09 जून- बिग बॉस मराठी सिझन २ मधलं पहिले एलिमनेशन आज पार पडणार आहे. पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता या सहाजणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. पराग सेफ झोनमध्ये तर अभिजीत केळकर डेंजर झोनमध्ये असल्याचं मांजरेकर यांनी काल WEEKEND चा डावमध्ये सांगितलं. आज अभिजीत बिचुकले आणि सुरेखाताई पुणेकर यांच्यामधील संभाषणामुळे कार्यक्रमामध्ये बरीच रंगत येणार आहे.

दुखावतीचे व्रण, पायात प्लॅस्टर, तापसीचे फोटो पाहून चाहते झाले हैराण

मांजरेकरांनी बिचुकले यांना सुरेखाजींना काही प्रश्न इंग्रजीमध्ये विचारण्यास सांगितले आणि त्यावरून बरीच गंमत झाली. दरम्यान आज घरामध्ये एक टास्कदेखील खेळण्यात येणार आहे. पूर्ण आठवड्यात कोणामुळे घरातील तापमान वाढले असा प्रश्न विचारला असता स्पर्धकांनी विणा आणि शिवानीचं नाव घेतलं. यामुळेच दोघींना एक टास्क पार पाडवा लागणार आहे. यात महेश घरच्यांना काही प्रश्न विचारणार, यात ज्याला जास्त मत मिळतील त्याच्यावर थंडगार पाण्याचा वर्षाव होणार आहे. आता शिवानी आणि विणा यांपैकी कोणाला या थंडगार पाण्याचा वर्षाव सहन करावा लागणार हे तुम्हाला आजच्या भागात कळेलच.

सुश्मिता सेनच्या भावाने कोर्टात जाऊन केलं लग्न, इथे पाहा PHOTO

विणा आणि शिवानीमध्ये झालेल्या वादाचा निकाल लावण्यासाठी सिझनचा पहिला खटला घरामध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले यांनी शिवानी सुर्वेला निर्दोष ठरवले. परंतु या सगळ्यामध्ये अभिजीत बिचुकले शिवानीच्या बाजूने असल्याचे विणाने व्यक्त केले. विणाला शिक्षादेखील सुनावण्यात आली. काल WEEKEND चा डावमध्ये विणाला महेश मांजरेकरांनी ती कुठे चुकते ते सांगितले तर शिवानीला कठोर शब्दांमध्ये खडसावले.

Loading...

सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या, गेम न खेळण्यास आणि बिग बॉस यांनी दिलेली शिक्षा म्हणजेच अडगळीच्या खोलीत रहाण्यास नकार देणे, परागशी तिचे असलेले वागणे या सगळ्यावर महेश मांजरेकरांनी शिवानीला खडे बोल सुनावले. अशा प्रकारची वागणूक इथे सहन नाही करणार, तुझ्या रागावर ताबा ठेव असे देखील तिला सांगितले. याचबरोबर घरात पार पडलेल्या टास्कबद्दल आणि इतर वादांबद्दलदेखील इतर सदस्यांशी मांजरेकर बोलले. आता या बोलण्याने शिवानीच्या वागण्यामध्ये आणि इतर सदस्यांच्या वागण्यामध्ये काही बदल होईल का हे येत्या आठवड्यांमध्ये कळेलच.

VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...