Bigg Boss Marathi 2- पाणी जपून वापरा टास्कवरून माधव- नेहामध्ये जुंपली

‘मला सांगितलस ना बोलायला मग मला बोलू दे’, बिचुकलेंवरून माधव- नेहामध्ये जुंपली

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 01:32 PM IST

Bigg Boss Marathi 2- पाणी जपून वापरा टास्कवरून माधव- नेहामध्ये जुंपली

मुंबई १४ जून२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात आज “पाणी जपून वापरा” हा टास्क रंगणार आहे. महाराष्ट्रातील बरेच प्रदेश पाणी टंचाईसारख्या गंभीर परिस्थितीला सामारे जात आहेत. बिग बॉसच्या घरात २४ तास पाणी पुरवठा होतो परंतु या परिस्थितीची प्रत्येक सदस्याला जाणीव असणे आवश्यक असल्याने, आज घरात पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात येणार आहे. यासाठीच पाण्याचे नियोजन कसे करावे याचा प्रत्यय सदस्यांना येणे महत्वाचे आहे. हे कार्य दोन टीममध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरणार आहे.

हेही वाचा- विराटसाठी काहीपण! त्याला भेटता यावं म्हणून अनुष्का करतेय तारेवरची कसरत

दरम्यान आज नेहा आणि माधवनमध्ये वाद झालेलाही पाहायला मिळणार आहे. अभिजीत बिचुकलेंमुळे आज नेहा आणि माधवमध्ये वाद होणार आहे. बिग बॉस आज घरातला पाणीपुरवठा बंद करणार अशी घोषणा करणार आहेत. ही घोषणा होताच घरामध्ये गोंधळ उडाला. यामध्ये अभिजीत बिचुकलेंचा वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. ही घोषणा होताच बिचूकलेंनी बिग बॉसना फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती केली. बिचुकले स्टोर रूममध्ये पाणी घेण्यास पोहचले. यावर नेहाने बिचुकलेंना असं करू नका असं बजावलंही.

हेही वाचा- ब्रेकअप होताच सलमानची अभिनेत्री पडली एकटी

ते ऐकत नाही हे कळल्यावर तिने माधवला अभिजीत यांना समजविण्याची विनंती केली. माधवने त्यांना भांड्यातलं सगळं पाणी संपवू नका आणि लगेच तोंड धुवून या अशी विनंती केली. माधव, बिचुकले यांना समजवत असताना नेहा परत मध्ये बोलल्याने माधवला राग आला आणि त्याचा आवज चढला, ‘मला सांगितलस ना बोलायला मग मला बोलू दे’ अशा मोठ्या आवाजात माधव नेहावर ओरडला. माधवने बिचुकलेना ते नियम मोडत असल्याचे सांगितले. आता अभिजीत बिचुकले नियम मोडणार की माधवचं ऐकणार हे आजच्या भागात नक्की कळेल.

Loading...

हेही वाचा- आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’

VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 01:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...