मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनला आज 'कलर्स मराठी' वर सुरवात

मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनला आज 'कलर्स मराठी' वर सुरवात

मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनला आज 'कलर्स मराठी' वाहिनीवर मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. या घरात राहण्यासाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आलीय. यात 8 महिला आणि 7 पुरूष स्पर्धकांचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई,ता.15 एप्रिल: मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनला आज 'कलर्स मराठी' वाहिनीवर मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. महेश मांजरेकरांच्या ग्रँण्ड परफॉर्मन्सने या नव्या कोऱ्या शोच्या ग्रॅण्ड प्रिमीअरला सुरूवात करण्यात आली. घरात नक्की कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मात्र याबाबतचा सस्पेन्स आज अखेर संपला.

या घरात राहण्यासाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आलीय. यात 8 महिला आणि 7 पुरूष स्पर्धकांचा समावेश आहे. हे सगळे स्पर्धक पुढचे 100 दिवस अनेक कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली या घरात एकत्र राहणारेत.

प्रत्येक स्पर्धकाने खास परफॉर्मन्स देत या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यासोबतच सुपर कूल सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांना मोठ्या शिताफीने उत्तरं दिली. सध्या जरी लोकांचं मन जिंकण्यासाठी हे स्पर्धक घरात दाखल झाले असले तरीही आत गेल्यावर मात्र विजयी होण्यासाठी त्यांना आपापसात झुंजावं लागणारे.

या स्पर्धकांसमोर एकमेकांशी जुळवून घेण्यासोबतच घरातील सगळ्या जबाबदाऱ्या आपापसात वाटून त्या पूर्ण करण्याची जबाबदारी असेल. एरवी मराठी सिनेसृष्टीत वावरताना एक चेहरा घेऊन हे सारे लोकांसमोर आलेत. मात्र घरात 100 दिवस एकत्र राहताना हा मुखवटा गळून पडून अनेकांचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.

'मराठी बिग बॉस'च्या घराला एखाद्या राजेशाही वाड्याप्रमाणे सजवण्यात आलंय. घराची अंतर्गत सजावटही अत्यंत कलरफुल आहे. घराच्या बाहेर स्विमींगपूल, बसण्यासाठी खास खुर्च्या, सुंदर हिरवळ आणि खास तुळशी वृंदावनही ठेवण्यात आलंय. घराच्या भिंती वारली पेंटींग्जनी सजवण्यात आल्यात. किचनमध्ये नव्या भांड्यांसह, गॅस, फ्रिज आणि अनेक सोयीसुविधा देण्यात आल्यात.

'मराठी बिग बॉस'चा ग्रँण्ड ओपनिंग झाल्यानंतर आता खरा खेळ सुरू होणारे. हा शो यापूर्वी हिंदीसह बंगाली, तेलगु, तामिळ, कन्नड अशा प्रादेशिक भाषांमध्ये यशस्वी ठरलाय. त्यामुळे 'मराठी बिग बॉस'ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो याचीही उत्सुकता आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता आणि शनिवार आणि रविवार रात्री 9. 00 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित करण्यात येईल.

हे आहेत 'मराठी बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक -

1) रेशम टिपणीस

2) विनीत बोंडे

3) आत्साद काळे

4) जुई गडकरी

5) अनिल थत्ते

6) स्मिता गोंदकर

7) आरती सोळंकी

8) भूषण कडू

9) उषा नाडकर्णी

10) मेघा धाडे

11) सई लोकूर

12) पुष्कर जोग

13) ऋतुजा धर्माधिकारी

14) सुशांत शेलार

15) राजेश श्रृंगारपुरे

 

 

First published: April 15, 2018, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading