• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi: घरात येण्यापूर्वीच सोनालीचं ठरलंय लग्न? समजताच विशालला बसला धक्का

Bigg Boss Marathi: घरात येण्यापूर्वीच सोनालीचं ठरलंय लग्न? समजताच विशालला बसला धक्का

'बिग बॉस मराठी' सीजन ३ (Bigg Boss Marathi) सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. स्पर्धकांचे राडे, वादविवाद, प्रेम,मैत्री या गोष्टींनी चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. शोमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. त्यामुळे शो पाहणं आणखीनच रंजक होतं.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर- 'बिग बॉस मराठी' सीजन ३  (Bigg Boss Marathi)  सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. स्पर्धकांचे राडे, वादविवाद, प्रेम,मैत्री या गोष्टींनी चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. शोमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. त्यामुळे शो पाहणं आणखीनच रंजक होतं. घरामध्ये अनेक स्पर्धकांचं एकेमकांशी एक वेगळं नातं तयार झालं आहे. त्यामधीलच एक म्हणजे सोनाली  (Sonali Patil)  आणि विशाल (Vishal Nikam)  यांचं नातं होय. या दोघांना प्रेक्षकांकडून मोठी पसंतीही मिळत आहे. मात्र नुकताच असं काही घडलं आहे, कि ज्यामुळे यांचं नातं कोणतं नवं वळण घेणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
  नुकताच बिग बॉसच्या नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये विकास, विशाल आणि सोनाली गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान असं काही होतं कि त्यामुळे सोनाली आणि विशाल यांच्या नात्यात एक मोठं वादळ येतं. या तिघांच्या गप्पा सुरु असताना. विकास म्हणतो, कि सोनालीचं लग्न ठरलं आहे. यावर विशालला धक्का बसतो. मात्र सोनाली शांत असते. विशाल याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगतो. विकास म्हणतो, मला स्वतः सोनालीने सांगितलं आहे, तिचं लग्न ठरलं आहे. आणि त्या मुलाचं नाव अक्षय असं आहे. यावर विशाल प्रचंड दुखावतो. आणि तो सोनालीकडे याचं स्पष्टीकरण मागू लागतो. विशाल म्हणतो तू मला सांगितलं होतंस कि, आधी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होता. मात्र आता असच काहीच नाही. सर्वकाही संपलं आहे. यावर सोनाली त्याला जाऊ देना सोड असं उत्तर देते. (हे वाचा:Bigg Boss Marathi:बिग बॉसच्या घरात भरणार मासळी बाजार! विकास जयला विकणार सारंगे) यावर विशाल म्हणतो, एक जवळचा मित्र म्हणून मला या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आणि तू या सर्व गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास. तसेच विशाल सोनालीला म्हणतो, तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस. म्हणजे तू आणखी किती आणि काय-काय गोष्टी माझ्याशी खोट्या बोलल्या असशील. तू हे कस करू शकतेस, यावर सोनालीकडे नेमकं असं काहीच उत्तर नसतं. सोनाली या सर्व संवादानंतर तेथून उठून जाते. त्यांनतर विशाल विकासाला म्हणताना दिसतो, सोनालीने इतकी महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवून कशी ठेवली. मग ही माझ्या फीलिंग्ससोबत खेळत आहे का? असा प्रश्न विशाल विकासला विचारतो. यावर विकास म्हणतो 'कन्टेन्ट'. (हे वाचा:'Bigg Boss Marathi' मीरा जगन्नाथच्या हातावर आहे हा खास 'टॅटू'; शो संपताच.....) आता सोनाली खरंच 'कन्टेन्ट' साठी विशालच्या फीलिंग्सशी खेळत आहे. ,कि सोनालीच्या या गोष्टींमागे वेगळंच काही कारण आहे. हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. या सर्व गोष्टींनंतर घरामध्ये बहरत चाललेलं हे नातं आता कोणतं नवं वळण घेणार हे बघणं औत्सुक्याचं असेल. सोनाली आणि विशाल शोमध्ये सतत एकेमकांना सपोर्ट करताना, एकमेकांशी भांडताना, मनवताना दिसू येतात. त्यामुळे या दोघांचं बॉन्डिंग रसिक प्रेक्षकांना फारच आवडल्याचं दिसून येतं. त्यामुळे या दोघांमधील हा वाद कोणतं नवं वळण घेणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: