नुकताच बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये घरातील स्पर्धक अर्थातच मीनल, सोनाली, विकास, विशाल, दादूस,अविष्कार आणि तृप्ती हे एकेमकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी सोनाली पाटील त्यांना आपल्या कांदे पोहेच्या कार्यक्रमबद्दल सांगते. व्हिडीओमध्ये ती सांगत आहे. 'मी डी एडला असताना माझ्यासाठी एक स्थळ आलं होतं. त्यामुळे मला कोल्हापूरहुन गावाकडे बोलवण्यात आलं होतं. मला अजिबात लग्न करायचं नव्हतं. मात्र तरीही हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिकडून काही महिला आल्या होत्या त्यांनी मला एका खुर्चीवर बसवलं. आणि माझ्या ओटी भरण्याचा कार्य्रक्रम सुरु झाला. माझ्या पदरामध्ये ते नारळ, गहू,पान, सुपारी घालण्यात येत होतं. पण ते मला सवर्ण खूप कठीण होत होतं माझी फार फजिती झाली होती. मी खूपच भांभावून गेले होते. ते मला नीट पदरामध्ये धरताच येत नव्हतं. असं ती सांगत असते. आणि इतर स्पर्धक तिचा हा मजेशीर किस्सा मन लावून ऐकत असतात. आणि ते हसून तो किस्सा एन्जॉयही करत असतात. असा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi 3 : 'कोल्हापूरची म्हणून उगाच...' मीराने उडवली खिल्ली ... ) कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी'आपल्या भेटीला येतो. या शोची लोकप्रियता फार मोठी आहे. नुकताच बिग बॉसचा तिसरा सीजन सुरु झाला आहे. हा या सीजनचा चौथा आठवडा सुरु आहे. हे स्पर्धक आता एकमेकांच्या जवळ येत आहेत. एकमेकांशी खाजगी गोष्टी शेअर करत आहेत. टास्क आणि इतर कामे या व्यतिरिक्त हे लोक एकमेकांशी मजामस्ती करतानाही दिसून येतात. शोमध्ये एकूण १५ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. त्यातील अभिनेता आणि स्पर्धक अक्षय वाघमारे हा पहिल्याच एलिमिनेशनमध्ये घराबाहेर झाला आहे. त्यांनतर लगेचच एक वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा झाली आहे. त्याजागी वाईल्ड कार्ड म्हणून अभिनेता आदिश वैद्यने एन्ट्री घेतली आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi 3 : आदिश आणि जयमध्ये तुफान राडा ; आदिश म्हणाला ... ) तसेच सध्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. त्यामुळे स्पर्धक फारसे खुश दिसत नाहीयेत. पहिल्याच दिवशी जयने आदिशसोबत राडा केला होता. त्यांनतर सलग हे दोघे एकमेकांना टेशन देताना दिसत आहेत. तर मीरा, गायत्री, उत्कर्ष, स्नेहा हे जयसोबत मिळून आदिश वैद्यची गॉसिपिंग करत आहेत. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला होता आणि त्याने तो पुर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागली होती. दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या आदेशापर्यंत घराचे पहारेकरी बनून होते याचदरम्यान त्यांच्यात वाद झाला होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.