मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बिग बॉसमधून बाहेर पडताच स्नेहा वाघचा 'जुगुनू' डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल

बिग बॉसमधून बाहेर पडताच स्नेहा वाघचा 'जुगुनू' डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल

नुकताच घरातून स्नेहा वाघ   (Sneha Wagh)   बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र घरातून बाहेर पडताच स्न्हेहा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच घरातून स्नेहा वाघ (Sneha Wagh) बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र घरातून बाहेर पडताच स्न्हेहा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच घरातून स्नेहा वाघ (Sneha Wagh) बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र घरातून बाहेर पडताच स्न्हेहा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, 26 नोव्हेंबर- सध्या बिग बॉस मराठीचा  (Bigg Boss Marathi)  तिसरा सीजन  (Season 3)  सुरु आहे. हा सीजन चांगलाच चर्चेत आहे. घरातील राडे, वादविवाद असो, मैत्री असो, प्रेम असो किंवा स्पर्धकांची पर्सनल लाईफ असो. या सर्वांचीच जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच घरातून स्नेहा वाघ   (Sneha Wagh)   बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र घरातून बाहेर पडताच स्न्हेहा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघ 'बी बॉस मराठी' च्या घरातून बाहेर पडताच सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. काही वेळेपूर्वी स्नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहतेसुद्धा थिरकत आहेत. स्नेहा वाघने सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करत असलेल्या 'चमकू जैसे जुगुनु' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. यामध्ये स्नेहा आपली लहान बहीण क्रितिका वाघसोबत डान्स करताना दिसत आहे. यामध्ये स्नेहाने पांढरा शर्ट आणि ग्रीन कलरचा स्कर्ट घातला आहे. तर तिच्या बहिणीनेसुद्धा त्याच कलरचा ड्रेस घातला आहे. या दोघीनी ट्विनिंग केल्याचं स्नेहानं म्हटलं आहे. तसेच बहिणीच्या आग्रहाखातर या ट्रेंडवर डान्स केल्याचंही स्नेहाने म्हटलं आहे. यामध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत.

स्नेहाने काही वेळेपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच तिचे चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा करत आहेत. स्नेहाला बिग बॉस मराठीमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. स्नेहाने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र या शोने तिला पुन्हा घराघरात पोहोचवलं आहे. या शोमध्ये स्नेहाच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच जास्त चर्चा झाली. तिच्या फॅमिलीपासून ते तिच्या दोन लग्न आणि घटस्फोटपर्यंत सर्व विषय समोर आले होते. त्यामुळे स्नेहा फारच चर्चेत होत.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: कॅप्टन्सी टास्कदरम्यान विशाल-विकासमध्ये हाणामारी)

बिग बॉसच्या घरात तिचा पूर्व पती अविष्कार दारव्हेकरसुद्धा होता. मात्र या दोघांमध्ये फारसं काही घडलं नाही. तर दुसरीकडे स्नेहा आणि जयमध्ये फारच चॅनल बॉन्डिंग टायर झालं होतं. हे दोघे नेहमीच सोबत असत. एकेमकांना सपोर्ट करत. हे दोघे एकमेकांना पसंत करत असल्याचं सर्वानाच दिसून येत होतं. अनेक वेळा महेश मांजरेकर त्यांच्यासोबत या विषयावर मजामस्ती करताना दिसत. मात्र तब्बल ६० दिवस घरात राहिल्यानंतर स्नेहाचं एलिमिनेशन झालं. गेल्या आठवड्यात स्नेहा बाहेर पडली. मात्र कोणालाच हे अपेक्षित नव्हतं, स्नेहा आणखी घरात राहावी असच वाटत होतं. तसेच घरात स्नेहाचा 'सरांगे बिग बॉस' हा डायलॉग फारच लोकप्रिय झाला आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment