मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Season 4 : विकास असं काही सांगून गेला की पहिल्याच दिवशी योगेशला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Season 4 : विकास असं काही सांगून गेला की पहिल्याच दिवशी योगेशला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

बिग बॉसच्या घरात 100 दिवस आपल्या घरापासून दूर राहणं सहज शक्य नाहीये. याचा पहिला प्रत्येय पहिल्याच दिवशी स्पर्धकांना येणार आहे. 03 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये काय घडणार जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 03 ऑक्टोबर:  टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटील आला आहे. अनेक दिवस या शोसाठी प्रेक्षकांची आतुरता धरून ठेवली होती. शोमध्ये कोणते कलाकार दिसणार इथपासून बिग बॉसचं घर कसं असणार इथ पर्यंत सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम देत ऑल इज वेल म्हणत बिग बॉस मराठीचा चौथा सीझन अखेर सुरू झाला आहे. घरात जाताच स्पर्धकांनी खेळाला सुरुवात केलीये. चार स्पर्धकांना अपात्र ठरवण्यावरुन स्पर्धकांमध्ये वादावादी मतमतांतर पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे काही स्पर्धक पहिल्याच दिवशी भावुक झाल्याचं पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात जाताच पहिल्याच दिवशी बॉडीबिल्डर योगेशला अश्रू अनावर झाले आहेत. किरण माने आणि विकास यांच्याशी बोलताना अचानक रडू लागला.

बिग बॉसच्या आजच्या म्हणजेच 03 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की, 'योगेश किरण माने आणि विकासला सांगताना दिसला, "आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत. आपण स्पेशल आहे, महादेवाने आपल्याला हि ऍबिलिटी दिली आहे याचा फायदा आपण करून घ्यायचा'. योगेशच्या बोलण्यानंतर विकास पुढे म्हणाला, 'बिग बॉसमध्ये आपण आलो म्हणजे आपण खास आहोत'. किरण माने त्यावर म्हणाले,"काही जणांना त्यांचा संघर्ष बघून बोलावलं आहे'. शेवटी विकास म्हणाला, काल सामान भरताना मला माझी आई आठवली, हे ऐकून योगेशला त्याचा आईची आठवण आली आणि त्याला रडू कोसळले.

हेही वाचा - Bigg boss marathi 4 : 'नाद करायचा नाय'; 2022 मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची Bigg Boss च्या घरात एन्ट्री

या घरात प्रत्येकाला आपल्या माणसाची आठवण येते. पण घरातले सदस्यचं एकमेकांचा आधार बनतात, त्यांचे मनोबळ वाढवतात, त्यांना धीर देतात. कारण 100 दिवस आपल्या घरापासून दूर राहणं सहज शक्य नाहीय.  माणसांशिवाय, कुठल्याही करमणूकीच्या साधनांशिवाय राहायचे म्हणजे सोपं नाहीये. या घरात क्षणोक्षणी आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण येणे सहाजिकच आहे. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले १६ सदस्य पुढची 100 दिवस काय रंगत आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठीच्या वेळेत बदल

बिग बॉस मराठी 4 सुरू झालं असलं तरी शो च्या वेळेत बदल केला आहे. याआधीचे तीन सीझन दररोज रात्री 9.30 वाजता सुरू होत होता. पण बिग बॉसचा चौथा सीझनचे एपिसोड रात्री 10 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Marathi news