मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi: घरामध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क; सोनालीमुळे तृप्ती होणार नॉमिनेट!

Bigg Boss Marathi: घरामध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क; सोनालीमुळे तृप्ती होणार नॉमिनेट!

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात येत्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसून येणार आहे. यामध्ये सोनाली पाटीलमुळे तृप्ती देसाई नॉमिनेट होताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात येत्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसून येणार आहे. यामध्ये सोनाली पाटीलमुळे तृप्ती देसाई नॉमिनेट होताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात येत्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसून येणार आहे. यामध्ये सोनाली पाटीलमुळे तृप्ती देसाई नॉमिनेट होताना दिसून येणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5ऑक्टोबर- 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) च्या घरात येत्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसून येणार आहे. यामध्ये सोनाली पाटीलमुळे तृप्ती देसाई नॉमिनेट होताना दिसून येणार आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये हा अनोखा नॉमिनेशन टास्क(Nomination Task) रंगताना दिसून येणार आहे.

सर्वांचा प्रचंड आवडता मात्र तितकाच विवादित शो म्हणून बिग बॉसला ओळखलं जातं. बिग बॉसचे स्पर्धक त्यांचे वादविवाद आणि त्यांचे टास्क यामुळे शोची नेहमीच चर्चा असते. धमाकेदार ट्विस्टसह बिग बॉस मराठीचा तिसरा आठवडा सुरु झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धकांना एक नॉमिनेशन टास्क देण्यात आला आहे. यामध्ये स्पर्धकांना गळ्यात अडकवण्यासाठी पुठ्ठयांचे मोबाईल्स देण्यात आले आहेत. हे मोबाईल गळ्यात अडकवून चार्जिंग संबंधी हा टास्क करायचा आहे. दरम्यान सोनालीमुळे तृप्ती देसाई नॉमिनेट झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. हा टास्क नेमका काय आहे? हे एपिसोड पहिल्यानंतरच समजणार आहे. त्यामुळे प्रोमो पाहून प्रेक्षक एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

(हे वाचा:Bigg Boss Marathi 3 च्या घरातील 'या' सदस्याच्या निर्णयामुळे विशल ... )

बिग बॉस मराठीची धमाकेदार सुरुवात झाली आहे. कोरोना काळात लांबणीवर पडलेला हा शो अखेर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरामध्ये पहिल्या दिवसांपासून स्पर्धकांमध्ये वादविवाद होताना दिसू येत आहेत. घरामध्ये तब्बल १५ स्पर्धक होते. मात्र कालच कीर्तनकार शिवलीला पाटीलने बिघडलेल्या तब्येतीमुळे बिग बॉसच्या खेळातून माघार घेतली आहे. नुकतंच हा एपिसोड पार पडला. यावेळी विशाल पाटील, सोनाली पाटील, सुरेखा कुडचीसह इतर स्पर्धक भावुक झालेले दिसून आले. त्यांनतर घरामध्ये पुन्हा वातावरण सर्वसाधारण होत आहे.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: शिवलीला पाटील घराबाहेर! अचानक 'या' कारणास्तव ... )

बिग बॉसच्या घरात उरलेल्या १४ स्पर्धकांमध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी जोरदार लढत सुरु आहे. प्रत्येक टास्क दरम्यान हे स्पर्धक जीव तोड मेहनत करताना दिसून येतात. दरम्यान यांच्यामध्ये वादविवादही होताना दिसून येतात. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात दोन ग्रुप पडलेले पाहायला मिळत आहेत. एका ग्रुपमध्ये विकास, विशाल, मीनल, अविष्कार, सोनाली आणि सुरेखा तर दुसऱ्या ग्रुपमध्ये जय, मीरा, दादूस, गायत्री, स्नेहा, अक्षय आणि उत्कर्ष दिसून येत आहेत. या टास्क दरम्यान अजून कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment