मुंबई, 25 डिसेंबर- बिग बॉसचा मराठीचा (Bigg Boss Marathi) हा तिसरा सीजन (Season 3) अतिशय लोकप्रिय ठरला. या सीजनला प्रेक्षकांचं अतिशय मिळत आहे. सध्या हा शो आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. शोचा फिनाले (Grand Finale) अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी घरातील स्पर्धकांना एक मोठं सरप्राईज देण्यात आलं आहे. पाहूया काय आहे हे सरप्राईज..
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच बिग बॉसचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून सर्वच प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. कारण या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धकांसाठी एक खास सरप्राईज देण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे. प्रोमोमध्ये टॉप पाच (Top 5) स्पर्धक लिव्हिंग रूममध्ये बसले आहेत.कारण बिग बॉस त्यांच्यासाठी एक खास अनाऊन्समेंट करत आहेत. यामध्ये बिग बॉस त्यांना सांगतात की, जेव्हा-जेव्हा या घरात कावळा ओरडेल तेव्हा काही पाहुणे तुम्हाला घरामध्ये भेटायला येतील. बिग बॉसचं हे बोलणं ऐकून सर्व स्पर्धक आनंदाने ओरडू लागतात. त्यांनतर घरामध्ये पाहुण्यांचं आगमन होतं, या आलेल्या पाहुण्यांना पाहून घरातील सदस्य फारच खुश आहेत. कारण हे पाहुणे त्यांच्या घरातील माजी सदस्य आणि त्यांचे मित्रच आहेत.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात कावळा ओरडताच, घरामध्ये दादूस, तृप्ती देसाई,सोनाली पाटील, मीरा जग्गनाथ, स्नेहा वाघ,गायत्री दातार, निथा शेट्टी,अक्षय वाघमारे आणि सुरेखा कुडची यांची एन्ट्री होते. घरामध्ये या सर्वांचं आगमन होताच एकच कल्ला सुरु होतो. सर्वजण एकमेकांना मिठी मारून आनंदाने नाचू लागतात. तसेच हे सर्व स्पर्धक घरातील टॉप ५ स्पर्धकांशी आपल्या न बोलू शकलेल्या किंवा राहून गेलेल्या गोष्टीसुद्धा स्पष्ट करणार आहेत. त्याचवेळी स्नेहा उत्कर्षला पुन्हा एकदा आपल्याविरुद्ध केलेल्या स्ट्रॅटिजीबद्दल बोलून दाखवते. तर दुसरीकडे उत्कर्ष आणि जय सोनालीसोबत एका टास्कची आठवण सांगून चेष्टामस्करी करताना दिसून येतात. हा प्रोमो समोर येताच सर्व प्रेक्षक बिग बॉसचा हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
View this post on Instagram
'बिग बॉस मराठी' च्या या प्रवासाची सुरूवात 15 सदस्यांसोबत झाली होती. त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त TOP 5 सदस्य राहिले आहेत. यामध्ये विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा यांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली होती. या 100 दिवसात हे सदस्य अनेक भाव भावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले आहेत. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या या घराला घरपण दिलं होतं.येत्या २६ डिसेंबरला या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.