'बिग बॉस' हा अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा लाडका 'बिग बॉस मराठी' शोला १९ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. या शोचा पहिला आठवडा अलमोस्ट पार पडला आहे. घरामध्ये पहिल्याच दिवसापासून राडे होताना दिसून आले. अनेकांनी टास्क दरम्यान एकमेकांशी पंगा घेतला तर अनेकांनी घरातील इतर गोष्टींवरून. यातील एक स्पर्धक पहिल्याच दिवसापासून घरात राडे घालताना दिसून येत आहे. ही स्पर्धक म्हणजे अभिनेत्री मीरा जग्गनाथ होय. मीराने पहिल्याच दिवशी जय दुधानेसोबत टॉवेलवरून वाद घातला होता. तर दुसऱ्या दिवशी स्नेहा वाघशी जेवणावरून राडा केला होता. दरम्यान शोध्ये सर्वात खराब आचारीच्या टास्कमध्ये अनेक लोकांना मीरा चुकीची वाटली. (हे वाचा: Bigg Boss Marathi: आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या ...) याच टास्क वरून काल महेश मांजरेकर यांनी मीरा जग्गनाथला चांगलंच झापलं आहे. या टास्कमध्ये अक्षय वाघमारेकडे किचनचा ताबा देण्यात आला होता. यावेळी एखादी बिघडलेली डिश दुसऱ्या स्पर्धकाला खाऊ घालायची होती. दरम्यान मीरा आणि गायत्रीच्या प्लॅनिंगने अक्षयने अतिशय खराब डिश बनवली जे सर्वसामान्य लोकांना खाणं शक्यचं नाही. आणि डिश दुसरा स्पर्धक दादूसला खाऊ घातली. टास्कचा भाग म्हणून दादूसने इतकी खराब डिश खाण्याचं धाडस केलं. मात्र यावेळी मीराने दादूसला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचा टास्क कसा खराब झाला यावर लक्ष देण्यास उकसवलं. हेच सर्व प्रेक्षकांना खटकलं. या कारणावरून महेश यांनी मीराला खडेबोल सुनावले. तसेच दुसऱ्यांचं न ऐकता पुढे बोलणाऱ्या मीराला इतरांचं आधी ऐकून घेत जा असा सल्लाही त्यांनी मीराला दिला आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi:नॉमिनेशन टास्कनंतर घरात रंगणार चिऊताईचा खेळ ... ) कालच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर यांनी सर्व स्पर्धकांची शाळा घेतली आहे. कोण कुठे चुकला नि कोण कुठे योग्य होता, हे होस्ट महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या चावडीवर दाखवून दिलं आहे. दरम्यान महेश यांनी गायत्री दातारला मीराच्या मागे न फिरत स्वतःचा खेळ खेळण्याचा सल्लाही देऊन टाकला आहे. बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा जितका तुफानी होता. तितकाच विकेंड वारसुद्धा धमाकेदार होता. यानंतर स्पर्धकांचा डाव कसा असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.