मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कॅमेरा बघताच सुरेख कुडचींनी लपवला चेहरा; Bigg Boss3ची गँग एकत्र आली की करतेय असं काही

कॅमेरा बघताच सुरेख कुडचींनी लपवला चेहरा; Bigg Boss3ची गँग एकत्र आली की करतेय असं काही

बिग बॉस

बिग बॉस

बिग बॉस मराठी4चे स्पर्धक धुमाकूळ घालत असले तरी आधीच्या सीझनच्या स्पर्धकांना विसरून कसं चालेल. Bigg Boss3ची गँग एकत्र आल्यावर काय करतेय पाहा व्हिडीओ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 03 डिसेंबर : बिग बॉस मराठी 4 सध्या टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालत आहे. राखी सावंतच्या एंट्रीनंतर खेळाला वेगळा रंग आला आहे. बिग बॉस 3मधील विजेता विशाल निकम आणि मीरा जगन्नाथही वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झाले आहेत. मागचे काही दिवस खेळाला मजा येत नव्हती अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत होत्या. मात्र वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी सगळा गेमचं पलटवून टाकलाय. सध्या चर्चा बिग बॉस मराठी 4ची असली तरी आधीच्या सीझनच्या स्पर्धकांना विसरून कसं चालेल. प्रेक्षकही आजही बिग बॉस मराठी 3 च्या स्पर्धकांना मिस करत आहेत. तर तिकडे स्पर्धक देखील एकमेकांना मिस करत असतात.

बिग बॉस 3चे दमदार स्पर्धक नेहमीच रियुनियन करत असतात.  कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. असाच एक व्हिडीओ पाहायला मिळतोय ज्यात बिग बॉस सीझन तीनचे स्पर्धक भेटून धम्माल करताना दिसत आहेत. बीबी 3ची मैत्री त्यांची कायम टिकवून ठेवली आहे. अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सुरेख कुडची यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात घरातील मास्टर माइंड उत्कर्ष शिंदे, सगळ्यांचे लाडके दादूस, तडक फडक अशा तृत्पी देसाई आणि स्वत: सुरेखा कुडची शुटींग गेटअपमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा -  'काय गं ये...'; जेव्हा राखीला दम द्यायला Bigg Bossच्या घरात नाना पाटेकर येतात; पाहा VIDEO

उत्कर्ष, तृत्पी देसाई, दादूस आणि सुरेख यांनी अनेक दिवसांनी एकत्र येऊन धम्माल गप्पा मारल्या. व्हिडीओमध्ये त्यांचा उत्साह दिसून येत आहे. सोबत त्यांनी खास पोस्टही लिहिली आहे. त्यांनी म्हटलंय,  'BBM 3संपून साधारण 1 वर्ष झालं. अगदी रोज फोन होतात असा अजिबात नाही पण हो जेव्हा चान्स मिळेल तेव्हा भेटतो आणि मग काय धमाल मस्ती आणि टाइमपास'.

सीझन 3च्या कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. खूप मिस करत आहोत तुम्हाला. बीबीचा बेस्ट सीझन तुमचा होता, असं चाहत्यांनी म्हटलं आहे.

बिग बॉस कलाकार नेहमीच एकमेकांना भेटल्यानंतर फोटो पोस्ट करत असतात. नवरात्रीत विशाल, विकास, मीरा यांनी अक्षयबरोबर दगडी चाळीला भेट दिली होती. तर इकडे सोना आणि मोना म्हणजेच मीनल आणि सोनाली यांचे रिल्स पाहायला मिळत असतात. तर दुसरीकडे उत्कर्ष आणि जय दुधाणे नव्या सिनेमाची एकत्र तयारी करताना दिसून येतात.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news