Bigg Boss विनर शिवला वाढदिवसाच्या अगोदरच वीणानं दिलं ‘हे’ खास सरप्राइझ गिफ्ट

Bigg Boss विनर शिवला वाढदिवसाच्या अगोदरच वीणानं दिलं ‘हे’ खास सरप्राइझ गिफ्ट

बिग बॉस मराठी 2 मधील क्यूट कपल शिव आणि वीणा यांचं नातं घरातून बाहेर निघाल्यानंतर संपेल असं म्हटलं जात होतं. पण वीणा मात्र शिवच्या प्रेमात आकंठ बुडालेली असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व नुकतंच संपलं. यावर्षी अमरावतीचा शिव ठाकरे या पर्वाच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला. बिग बॉसमध्ये शिव रोडीज या रिअलिटी शोमध्ये लोकप्रिय ठरला होता. या शोच्या उपांत्य फेरीपर्यंत त्यानं मजल मारली होती. त्यानंतर बिग बॉसमध्येही तो त्याच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सच्या जोरावर 100 दिवस टिकून राहीला आणि दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मात्र त्याच्या परफॉर्मन्ससोबतचं तो प्रेक्षकांच्या लक्षात राहीला ते वीणा जगतापसोबतच्या नात्यामुळे. या दोघांचं नातं घरातून बाहेर पडल्यानंतर संपेल असा अंदाज अनेकांनी लावला होता मात्र या दोघांनी या सर्व शक्यतांना ब्रेक लावला आहे.

काही दिवसांनंतर म्हणजेच 9 सप्टेंबरला शिवचा वाढदिवस आहे आणि यासाठी विणानं त्याला त्याआधीच एक सरप्राइझ बर्थडे गिफ्ट दिलं आहे. वीणानं नुकताच शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढून घेतला. याचे फोटो शिवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना शिवनं लिहिलं, ‘आपल्या राणीचं अ‍ॅडव्हान्स बर्थडे गिफ्ट. आईशप्पथ हे तर आभाळाएवढं मोठं गिफ्ट आहे. यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही वीणा.’ शिव आणि विणाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Chhichhore Review : श्रद्धा-सुशांतनं जागवल्या कॉलेज लाइफच्या आठवणी

 

View this post on Instagram

 

Aaplya Rani cha advance Birthday gift ,Aaishapth hey tar aabhala peksha pan moth gift ,ya peksha motha kahich nai meri jaan @veenie.j 😍 Kasa vaatla tattoo tumhala? . . . #BirthdayGift #Veenie #Shiveena

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

या अगोदर शिवनं सुद्धा बिग बॉसच्या घरात वीणाच्या नावाचा टॅटू काढून घेतला होता. घरातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली होती. मात्र त्याचं हे नातं घरातून बाहेर पडल्यानंतर टिकणार नाही असंच सर्वांना वाटत होतं मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर शिवनं मी आईला मनवून वीणाशी लग्न करेन आणि अख्ख्या महाराष्ट्राला आमच्या लग्नाची पत्रिका जाईल अशी प्रतिक्रिया देत सर्वांची बोलती बंद केली होती. त्यानंतर आता वीणानं त्याच्या नावाचा टॅटू काढल्यानं त्यांचं नातं फक्त घरातला दिखावा नव्हता हे स्पष्ट झालं.

VIDEO : सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात येऊन पडला आणि...

रोडीजच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकला होता. पण ‘बिग बॉस मराठी 2’नं त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहीला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यानं तो वेळोवेळी नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता.वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेता विषय ठरली.

आईच्या प्रसिद्धीचा मॅनेजर्स गैरफायदा घेत आहेत, रानू यांच्या मुलीचा गंभीर आरोप

=====================================================================

VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या