Bigg Boss Marathi 2- बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर!

Bigg Boss Marathi 2- बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर!

महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एण्ट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकलेपासून सगळ्यांनाच फैलावर घेतले

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट- बिग बॉस मराठी 2 विकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एण्ट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकलेपासून सगळ्यांनाच फैलावर घेतले. त्यांनी सर्व स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली. बिचुकलेने घरातील कामं करण्यास नकार दिला, यावरूनच मांजरेकरांनी त्याला कडक शब्दामध्ये खडसावले आणि कुठलंही काम करण्यात कमीपणा नसतो. घरातील नियम हे पाळावेच लागतात असा सल्ला दिला.

शिव, वीणा आणि अभिजीत केळकरचीदेखील कानउघडणी केली. शिवला तू चांगला खेळतोस आणि बिग बॉसचा विजेता होण्याचे गुण तुझ्यात आहेत. पण, वीणाची नेहमी वकिली करत असतोस त्यामुळे तू वाईट ठरतोस आणि वीणा विक दिसते, असंही ते म्हणाले. मांजरेकरांनी शिवची आई आणि अभिजीतच्या मुलांचं कौतुक केलं.  या सगळ्यात तो महत्वाचा क्षण आला ज्यामध्ये दर आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर पडणं अनिवार्य असतं.

या आठवड्यात हिना, वीणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रुपाली नॉमिनेट झाले होते. रूपाली आणि वीणा डेंजर झोनमध्ये आले पण रुपालीला कमी मतं मिळाल्याने या आठवड्यामध्ये घरामधून बाहेर जावं लागलं. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन होईल.. स्पर्धकांना कोणते टास्क मिळणार हे पाहणं रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर रुपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर व्हिडिओ दाखवण्यात आला. एक विशेष अधिकार मिळाला आणि तिने ठरवल्याप्रमाणे हीनाला वाचवले.

लहान मुलाला सोडून लंच डेटला गेली 'ही' बॉलिवूड जोडी

लोक म्हणायचे काही दिवसही टिकणार नाही अजय- काजोलचं लग्न, आज आहे ‘हिट कपल'

एक्स वहिनी, भाऊ, एक्स गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडची बहीण; कोणाकोणाची मदत करणार सलमान

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या