Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार 'पारडं कॅप्टन्सी'चं कॅप्टन्सी टास्क; स्पर्धकांना द्यावी लागणार या गोष्टींची आहुती

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार 'पारडं कॅप्टन्सी'चं कॅप्टन्सी टास्क; स्पर्धकांना द्यावी लागणार या गोष्टींची आहुती

आज बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरामध्ये विशाल (Vishal Nikam) आणि जयमध्ये (Jay Dudhane) कॅप्टन्सी (Captancy Task) कार्य रंगणार आहे. असं म्हणतात मैत्रीचे पारड नेहेमीच भारी असतं. बघूया या टास्कमध्ये हे कितपत खरं ठरतं हे समजेलच.

पुढे वाचा ...
  मुंबई 11 नोव्हेंबर- आज बिग बॉस मराठीच्या  (Bigg Boss Marathi)  घरामध्ये विशाल  (Vishal Nikam) आणि जयमध्ये (Jay Dudhane)  कॅप्टन्सी  (Captancy Task) कार्य रंगणार आहे. असं म्हणतात मैत्रीचे पारड नेहेमीच भारी असतं. बघूया या टास्कमध्ये हे कितपत खरं ठरतं हे समजेलच. कॅप्टन्सी कार्याची वाट घरामध्ये प्रत्येक सदस्य बघत असतो. कारण, यातूनच घराला नवा कॅप्टन मिळतो. आता या टास्कमध्ये कोणत्या सदस्याला काय गमवावं लागणार आहे? सदस्य ते करण्यास तयार होतील ? हे आजच्या भागामध्ये कळेलच .
  बिग बॉस मराठी सिझन तिसराच्या आजसमोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, “उत्कर्ष कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी आपल्याला एक गोष्ट गमवावी लागणार आहे. आणि ती गोष्ट आहे... हे सांगताच जयला अश्रु अनावर झाले.. असं काय आहे जे उत्कर्षला गमवाव लागणार आहे ? उत्कर्ष जयसाठी तयार होईल ? काय असेल त्याचा निर्णय? हे आज पाहायला मिळणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. कारण घरामध्ये रंगणार आहे “पारड कॅप्टन्सीचे” हे कॅप्टन्सी कार्य ! ज्यामध्ये सदस्यांच्या काही गोष्टी पणाला लागणार आहेत . जय किंवा विशाल या दोघांमध्ये हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. घरातील सदस्यांना ठरवायचे आहे बिग बॉस यांनी सांगितलेल्या गोष्ट ते जय – विशालपैकी कोणासाठी गमावण्यास तयार आहेत. घरातील सदस्य हे करण्यास नकार देखील देऊ शकतात. कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यामध्ये कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आज बिग बॉस मीराला सांगणार आहेत, कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. आणि त्या आहेत आपल्याकडील soft toy म्हणजेच अप्पू आणि दुसरी गोष्ट स्टोररूम मध्ये ठेवली आहे. आणि या दोन्ही वस्तू आपल्याला पूर्णत: नष्ट करायच्या आहेत. उत्कर्ष मीराला समजावताना दिसणार आहे. कठीण प्रश्न कठीण प्लेयरला पडतात. आपण त्याची उत्तरं काढायची. As a player तू कशी आहेस बर्‍याचश्या गोष्टींनी दाखवून दिलंस ना टास्कमध्ये... मीरा म्हणाली मला झोप नाही येणार... उत्कर्ष म्हणाला. आम्ही गोष्टी सांगणार ना कॉमेडी आणि फालतूवाल्या.” बघूया मीरा त्याग करेल का ? आणि कोणसाठी करेल ते आजच्या भागामध्ये समजेलच. (हे वाचा: Bigg Boss Marathi: कॅप्टन्सी टास्क बनला कुस्तीचा आखाडा! कोणाच्या ... ) बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना देण्यात येणारे टास्क दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत जाणार आहेत, असे दिसून येतं आहे. पहिले मीरा आणि आता दादूस यांना देखील एक गोष्ट गमवावी लागणार आहे. आता दादूस त्या गोष्टीचा त्याग करण्यास तयार होतील ? कोणासाठी त्याग करणार दादूस ? हे आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉस दादूस यांना सांगणार आहेत, कॅप्टन पदाच्या उमेदवारला समर्थन देण्यासाठी आपल्याला एक गोष्ट गमवावी लागणार आहे आणि ती गोष्ट आहे आपले केस. दादूस, जय खूप भावुक झाले. जयला अश्रु अनावर झाले. दादूसना देखील रडू कोसळले. दादूस म्हणाले, खरंतर पहिल्या दिवसापासून या घरामध्ये मला प्रत्येकाने प्रेम दिले आहे. आपल्याला एक वरिष्ठ मंडळी समजून मला प्रत्येकाने प्रेम दिलं. मी आज या ठिकाणी खासकरून जय विषयी सांगू इच्छितो की, त्याने या घरात वडीलस्थानी मला बसवलं आहे, प्रत्येकवेळेस त्याने तो मानसन्मान मला दिला आहे...” बघूया दादूस त्यांना सांगितलेली गोष्ट करू शकतील का? त्यामुळे आजचा भाग पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या