मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Bigg Boss Marathi' मीरा जगन्नाथच्या हातावर आहे हा खास 'टॅटू'; शो संपताच रिमूव्ह करणार Tattoo

'Bigg Boss Marathi' मीरा जगन्नाथच्या हातावर आहे हा खास 'टॅटू'; शो संपताच रिमूव्ह करणार Tattoo

बिग बॉसमध्ये खलनायिका ठरत असलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथसुद्धा  (Mira Jagannath)  नेहमीच चर्चेत असते. अनेकांनी बिग बॉसमध्ये मीराच्या हातावरील टॅटू  (Tattoo)  पाहिला असेल. आज आपण या टॅटूबद्दलच जाणून घेणार आहोत.

बिग बॉसमध्ये खलनायिका ठरत असलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथसुद्धा (Mira Jagannath) नेहमीच चर्चेत असते. अनेकांनी बिग बॉसमध्ये मीराच्या हातावरील टॅटू (Tattoo) पाहिला असेल. आज आपण या टॅटूबद्दलच जाणून घेणार आहोत.

बिग बॉसमध्ये खलनायिका ठरत असलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथसुद्धा (Mira Jagannath) नेहमीच चर्चेत असते. अनेकांनी बिग बॉसमध्ये मीराच्या हातावरील टॅटू (Tattoo) पाहिला असेल. आज आपण या टॅटूबद्दलच जाणून घेणार आहोत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 23 नोव्हेंबर-   टीव्हीवरील  (Tv Show)  बहुचर्चित शो 'बिग बॉस' जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो वादग्रस्तसुद्धा आहे. या शोची नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चा असते. फक्त हिंदीच नव्हे तर मराठी बिग बॉससुद्धा    (Bigg Boss Marathi)   प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. अलीकडेच बिग बॉस मराठी सीजन ३ सुरु झालं आहे. हा शो दररोज चर्चेत असतो. यातील अनेक स्पर्धक प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत, तर काही स्पर्धक वारंवार ट्रोल होताना पाहायला मिळतात. बिग बॉसमध्ये खलनायिका ठरत असलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथसुद्धा  (Mira Jagannath)  नेहमीच चर्चेत असते. अनेकांनी बिग बॉसमध्ये मीराच्या हातावरील टॅटू  (Tattoo)  पाहिला असेल. आज आपण या टॅटूबद्दलच जाणून घेणार आहोत.

'बिग बॉस मराठी' चा तिसरा सीजन सुरु होऊन तब्बल ६० दिवस म्हणजेच जवळजवळ २ महिने झाले आहेत. या ६० दिवसांत या स्पर्धकांमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री आणि प्रेम सर्वकाही एकत्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे काही स्पर्धक प्रेक्षकांचे आवडते आहेत तर काही नावडते. बिग बॉसच्या घरात मीरा जग्गनाथ सतत वादविवाद आणि राडे करताना दिसून येते. अनेकांना ती अनफेयर वाटते तर काहींना ती अतिशय स्ट्रॉन्ग स्पर्धक वाटते. तर प्रत्येक आठवड्याला बिग बॉसमध्ये भरणाऱ्या चावडीवर तिला होस्ट महेश मांजरेकर यांच्याकडून ओरडाही पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. मात्र मीराचे काही चाहतेही आहेत. ज्यांना तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला नेहमीच आवडतं.

" isDesktop="true" id="633959" >

दरम्यान शोमध्ये सर्वांनीच मीराच्या शरीरावर टॅटू पाहिले आहेत. खासकरून मीराच्या हातावरील टॅटू अनेकांचं लक्ष वेधून घेतो. तिच्या चाहत्यांना नेहमीच त्या टॅटूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होते. आज आपण याच टॅटूबद्दल जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये मीरा घरातील इतर स्पर्धक अर्थातच दादूस,स्नेहा, गायत्री यांच्याशी गप्पा मारताना दिसली होती. यामध्ये तिने सर्वांना आपल्या टॅटूचं सत्य सांगितलं होतं. यावेळी सांगताना ती म्हणाली होती, ' हा टॅटू तिच्यासाठी खूपच खास आहे. कारण हा टॅटू एक इनिशियल आहे. अर्थातच तिच्या फॅमिलीतील सर्व सदस्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून हा टॅटू तिनं तयार केलं असल्याचं सांगितलं आहे'.

(हे वाचा:मी होणार सुपरस्टारच्या महाअंतिम सोहळ्यास येणार मराठीतल्या दिग्गज जोड्या )

मात्र मीरा पुढं असं देखील म्हणाली, की 'ती लवकरच हा टॅटू रिमूव्ह करणार आहे. तिच्या मते ती एक अभिनेत्री आहे, आणि शूटिंग करताना विविध भूमिका साकारताना हा टॅटू अडथळा ठरतो किंवा ठरू शकतो. हा टॅटू प्रत्येकवेळी सीनमध्ये दिसणं योग्य नसल्याचं ती म्हणते. तसेच मीराच्या मानेवरसुद्धा एक टॅटू आहे. मात्र हा टॅटू तिच्या केसांमध्ये लपून जात असल्याने तो ती रिमूव्ह करणार नसल्याचं तिनं सांगितलं आहे.  मीरा ही 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतील मोमो या भूमिकेतून घराघरात पोहोचली आहे. दरम्यान शोमधील आणखी एक स्पर्धक असलेले दादूसनेही आपल्या हातावर असलेलं दादूस या नावाचं टॅटू सर्वांना दाखवलं.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment