मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss Marathi: शिवलीला पाटील घराबाहेर! अचानक 'या' कारणास्तव सोडाव लागलं घर!

Bigg Boss Marathi: शिवलीला पाटील घराबाहेर! अचानक 'या' कारणास्तव सोडाव लागलं घर!

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी (Bigg Boss mMrathi 3) कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील कीर्तनकार  शिवलीला बाळासाहेब पाटील यांना अचानक घराबाहेर का पडावं लागतंय वाचा..

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी (Bigg Boss mMrathi 3) कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांना अचानक घराबाहेर का पडावं लागतंय वाचा..

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी (Bigg Boss mMrathi 3) कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांना अचानक घराबाहेर का पडावं लागतंय वाचा..

मुंबई 29 सप्टेंबर : कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3) कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांना देखील प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळते आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या  (Bigg Boss mMrathi 3 Latest Episode) या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली आणि ती म्हणजे कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील (Kirtankar Shivlila Patil). अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतंच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले “इथला प्रत्येक माणूस माझा असेल”. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मनं देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली. आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

वाचा : नवा प्रवास म्हणत सायकलवर झाला स्वार; कुठे निघालाय Umesh Kamat?

बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली आणि ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याचं दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले. नुकतच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले “इथला प्रत्येक माणूस माझा असेल”. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली. आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचे गाव आहे. सोशल मीडियावर ज्यांची कीर्तने प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील यांचं नाव घेतले जाते. शिवलीला यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करतात

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Marathi entertainment, Tv serial