Home /News /entertainment /

'जोडी दोघांची दिसते चिकनी' ,जय-मीराचा रोमँटिक फोटो होतोय VIRAL

'जोडी दोघांची दिसते चिकनी' ,जय-मीराचा रोमँटिक फोटो होतोय VIRAL

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मधील लोकप्रिय स्पर्धक जय दुधाणे (Jay Dudhane) आणि मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) लवकरच एका नव्या गाण्यात झळकणार आहेत.

  मुंबई, 22 जानेवारी-   'बिग बॉस मराठी'    (Bigg Boss Marathi)  मधील लोकप्रिय स्पर्धक जय दुधाणे   (Jay Dudhane)  आणि मीरा जगन्नाथ   (Mira Jagannath)  लवकरच एका नव्या गाण्यात झळकणार आहेत. त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच दोघांनी या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं आहे. मीरा आणि जयने आपल्या सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे. त्यांची जोडी पाहून चाहते फारच आनंदी आहेत. बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन नुकताच पार पडला. सांगलीचा विशाल निकम या स्पर्धेचा महाविजेता ठरला. परंतु बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. प्रेक्षक या शो नंतरसुद्धा त्यांना तितकंच प्रेम देत आहेत. त्यामुळेच बिग बॉसनंतर या स्पर्धकांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फारच आतुर झाले आहेत. दरम्यान मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी एकेमकांचा हात धरलेला दिसून येत आहे. अतिशय रोमँटिक या फोटोमध्ये दोघेही फारच सुंदर दिसतवाईट .
  जय आणि मीराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मीरा आणि जय समुद्रकिनाऱ्यावर असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये जय पुढे चालत आहे तर त्याच्या मागे मीरा आहे. जयने मीराचा हात घट्ट पकडलेला दिसत आहे. हे दोघे एखाद्या सुंदर जोडप्याप्रमाणे दिसत आहेत. जयने फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातला आहे. त्याच्या शर्टवर गुलाल दिसून येत आहे. तर दुरीकडे मीराने सुंदर पांढरी साडी नेसली आहे. मीराच्या हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्रसुद्धा आहे.हा फोटो शेअर करत त्यांनी #jodi Doghanchi Diste Chikani असा हॅशटॅग वापरला आहे. आणि कमिंग सुन असंसुद्धा म्हटलं आहे. यावरून याच गाण्याच्या ओळी असल्याचं लक्षात येत आहे. (हे वाचा:जय-मीरानं तांबडा-पांढऱ्यावर मारला असा ताव! झणझणीत VIDEO एकदा पाहाच) दरम्यान मीरा आणि जयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दोघेही जेवणाचा आस्वाद घेताना दिसून आले होते एका व्हिडीओमध्ये मीरा आणि जय झणझणीत मिसळ खात असलेल दिसत होते. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रश्यावर ताव मारताना दिसून येत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मीराम्हणताना दिसत होती, 'हॉट-हॉट मटन विथ हॉट-हॉट जय' तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये जय म्हणत होता, 'स्पाईसी मिसळ विथ सुपर स्पाईसी मीरा'. या दोघांचे व्हिडीओ चाहत्यांना फारच पसंतपडले होते. या व्हिडीओचं लोकेशन त्यांनी कराड असं सांगितलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या