• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi: जय-गायत्री ठरले 'हल्लाबोल'चे विजेता; मात्र नेटकऱ्यांकडून होतेय जबरदस्त टीका

Bigg Boss Marathi: जय-गायत्री ठरले 'हल्लाबोल'चे विजेता; मात्र नेटकऱ्यांकडून होतेय जबरदस्त टीका

नुकताच बिग बॉस मराठीमध्ये 'हल्लबोल' (Hallabol Task) हा टास्क पार पडला. यामध्ये अनेक राडे झाले. शेवटी हा टास्क जय-गायत्री या जोडीने जिंकला.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑक्टोबर- 'बिग बॉस'(हिंदी) हा शो उद्यापासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi) आपल्या भेटीला आला आहे. हा शो दररोज आपलं मनोरंजन करत आहे. या शोमध्ये पहिल्या दिवसापासून घरामध्ये अनेक वादविवाद होत आहेत. तसेच विविध टास्कदेखील घेतले जात आहेत. नुकताच बिग बॉस मराठीमध्ये 'हल्लबोल' (Hallabol Task) हा टास्क पार पडला. यामध्ये अनेक राडे झाले. शेवटी हा टास्क जय-गायत्री या जोडीने जिंकला. कलर्स वाहिनीवर बहुचर्चित 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व आपल्या भेटीला आलं आहे. इतर दोन्ही पर्वाप्रमाणे हे पर्वसुद्धा तितकंच रंजक आहे. बिग बॉसच्या घरामध्ये १५ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. हे सर्व चेहरे मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत फेमस चेहरे आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकरांना बिग बॉसच्या घरात पाहताना चाहत्यांना फारच मज्जा येत आहे. अनेक वादविवादानंतर बिग बॉसच्या घरातील पहिला आठवडा पार पडला होता. तसेच दुसऱ्या आठवड्याची 'जोडी कि बेडी' टास्कए धमाकेदार सुरुवात झाली होती. या टास्क दरम्यान बिग बॉसने नेमून दिलेल्या जोडीदारासोबत बेडीत अडकून राहायचं. तसेच नुकताच बिग बॉसच्या घरात एक नवा टास्क पार पडला. (हे वाचा:Bigg Boss Marathi 3 : अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये .. ) या नव्या टास्कचं नाव होतं 'हल्लाबोल' या टास्क दरम्यान आपल्या जोडीदारासोबत एका बाईकवर बसायचं. आणि इतर स्पर्धक त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतील. असा हा टास्क होता. जी जोडी उठेल तीची हार होईल आणि जी टीम त्यांना उठवण्यात यशस्वी होईल. ती टीम जिंकले असं हे गणित होतं. या 'हल्लाबोल' टास्क मध्ये जय आणि गायत्रीने विजय मिळवला आहे. विजयी होताच त्यांच्या टीमने त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर दादूस आणि तृप्ती देसाईने या दोघांना आपलं लॉकेट भेट म्हणून देऊ केलं आहे. त्यामुळे जय आणि गायत्री आपलं यश एन्जॉय करताना दिसले. मात्र टीम बी ला हा निकाल अजिबात मान्य झालेला नाहीय.
  या टास्कमध्ये ३ जोड्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम सुरेखा आणि सोनाली पाटील या बाईकवर विराजमान झाल्या होत्या. त्यांच्यवर पाणी, पावडर, अंडी विविध वस्तू टाकून उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळ टिकून राहिलेली ही जोडी नंतर बाईकवरून उठत टास्कमधून बाहेर पडली. त्यांनतर विशाल आणि विकास हि जोडी बसली होती. या जोडीने अतिशय सुंदर असं हे टास्क खेळलं आहे. हे दोघेही संपूर्ण एक दिवस बाईकवर बसून होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी बाईक सोडली. त्यांनतर जय आणि गायत्री या बाईकवर बसले नंतर या जोडीतील गायत्री आणि जयच्या दोर तोडण्यात आला. विकास आणि विशालचं म्हणणं होतं कि टास्क त्यांच्या टीमने जिंकला आहे. मात्र कॅप्टन उत्कर्षने जय आणि गायत्रीला विजेता घोषित केलं होतं. त्यामुळे पार्शलिटी झाल्याचं प्रेक्षकांकडून म्हटलं जात आहे. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निकलावर आक्षेपघेतला जात आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: