मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi: 100 दिवसांच्या प्रवासाचा होणार End! 'या' दिवशी रंगणार सीजन 3 चा 'Grand Finale'

Bigg Boss Marathi: 100 दिवसांच्या प्रवासाचा होणार End! 'या' दिवशी रंगणार सीजन 3 चा 'Grand Finale'

बिग बॉस मराठी'   (Bigg Boss Marathi)   सीजन ३  (Season 3)  फारच लोकप्रिय ठरला. या बहुचर्चित शो नं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.

बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीजन ३ (Season 3) फारच लोकप्रिय ठरला. या बहुचर्चित शो नं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.

बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीजन ३ (Season 3) फारच लोकप्रिय ठरला. या बहुचर्चित शो नं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 24 डिसेंबर-   'बिग बॉस मराठी'   (Bigg Boss Marathi)   सीजन ३  (Season 3)  फारच लोकप्रिय ठरला. या बहुचर्चित शो नं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. १०० दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीचं नवं घर नवीन सदस्यांनी सजलं आणि महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झालं होतं. आता हा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. काल झालेल्या शेवटच्या एव्हिक्शननंतर शो ला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. या स्पर्धकांसोबत आता बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 'बिग बॉस मराठी' च्या या प्रवासाची सुरूवात 15 सदस्यांसोबत झाली होती. त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त TOP 5 सदस्य राहिले आहेत. यामध्ये विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा यांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली होती. या 100 दिवसात हे सदस्य अनेक भाव भावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले आहेत. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या या घराला घरपण दिलं होतं. परंतु आता या प्रवासाचा शेवटचा टप्पा आला आहे. हा प्रवास येत्या रविवारी संपणार आहे. तरीदेखील या सर्व स्पर्धकांशी प्रेक्षकांचं नातं मात्र अधिक दृढ झालं आहे यात शंका नाही. बिग बॉस मराठी सिझन 3 देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा होत होती. आता या TOP 5 मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. येत्या 26 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. (हे वाचा:बिग बॉस मराठीस मिळाले टॉप 5, शेवटच्या एलिमिनेशनमधून मीरा जगन्नाथ out ) या घरामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून सदस्यांनी मैत्रीच्या शपथा घेतल्या ज्यामधील काही सदस्यांनी त्या निभावल्या देखील. पहिल्या आठवड्यापासून घरामध्ये दोन ग्रुप पडले. बिग बॉस मराठीच्या घरानं पहिल्या दिवसापासून सदस्यांचं भांडण बघितली, जसं -जसं दिवस पुढं गेले सदस्यांमध्ये नाती बनताना बघितली. आणि प्रवास संपता-संपता ही नाती बदलताना देखील दिसली. बिग बॉस मराठीचं हे घर सदस्यांच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे. या घराने उत्कर्षचं बुध्दीचातुर्य पाहिलं, मीनल - जय – विशालची टास्क जिंकण्याची जिद्द बघितली, मीराची चीडचीड आणि किचनवरच प्रेम पाहिलं, तृप्ती ताईंचा बेधडक अंदाज पाहिला, सोनालीची अखंड बडबड ऐकली. 17 सदस्यांसोबत सुरू झालेला हा 100 दिवसांचा प्रवास कसा संपला हे प्रेक्षकांनासुद्धा कळलच नाही. आता बिग बॉसला आपल्या तिसऱ्या सीजनचा विजेता काही तासांत मिळणार आहे. यासाठी चाहतेसुद्धा फारच उत्सुक आहेत.
First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment, Tv shows

पुढील बातम्या