Bigg Boss Marathi 2 : ...म्हणून बिग बॉसनी शिवला केलं कॅप्टन्सी कार्यातून बाद!

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये म्हातारीचा बूट हे कॅप्टनसी कार्य सुरू होते परंतू काही कारणाने स्थगित करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 05:02 PM IST

Bigg Boss Marathi 2 : ...म्हणून बिग बॉसनी शिवला केलं कॅप्टन्सी कार्यातून बाद!

मुंबई, 14 ऑगस्ट : बिग बॉस मराठीमध्ये घरातील सदस्यांना एक मस्त सरप्राईझ मिळणार आहे... आज जुन्या आठवणी, किस्से, मैत्री आणि टास्क हे पुन्हाएकदा परत प्रेक्षकांना आठवणार आहेत. कारण आज घरामध्ये पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे तसेच रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार जाणार आहेत. आता खेळाच्या या टप्प्यावर पोहचल्यानंतर हे जुने गडी नव्या सदस्यांना कोणते सल्ले देतील? कसे प्रोत्साहन देतील? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये म्हातारीचा बूट हे कॅप्टनसी कार्य सुरू होते परंतू शिवच्या चुकीमुळे हे कार्य स्थगित करण्यात आले. बिग बॉस यांनी शिवला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले आणि घराचा कॅप्टन होण्याच्या शर्यती मधून बाद केले आणि त्यामुळेच किशोरी शहाणे यांनी घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकवला.

हिना खानचं राखी सेलिब्रेशन, युजर्स म्हणाले मुस्लीम असून ईद विसरलीस का?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्यांची धूमधडाक्यात एंट्री झाली. पुन्हा एकदा घरामध्ये येऊन तिघेही खूप खुश होते. या तिन्ही सदस्यांनी पहिल्या पर्वामध्ये उत्तम प्रकारे टास्क पार पाडले. सदस्यांची जिंकण्याची जिद्द, बुध्दीचातुर्य प्रत्येक टास्कमध्ये दिसून यायचे. हे जुने सदस्य नव्या सदस्यांसोबत आज टास्क खेळणार आहेत. बघूया कोणाची टीम टास्क जिंकणार? कसे हे जुने गाडी नव्या सदस्यांना मार्गदर्शन करणार?

अभिनेत्री नेहा पेंडसे अडकणार लग्नाच्या बेडीत, पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा

Loading...

 

View this post on Instagram

 

#BiggBossMarathi2 च्या घरात मोठ्या जल्लोषात होणार आगमन काही खास पाहुण्यांचं... पाहा आज रात्री 9.30 वा #ColorsMarathi वर

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

आज घरामध्ये “जुना गडी नवं राज्य” हे साप्ताहिक कार्य पार पडणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घराचे रूपांतर एका राज्यात होणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य या राज्यातील रहिवाशी असतील. राणीला किंवा राजाला जिंकून देण्यासाठी राज्यातील रहिवाशी वेळोवेळी कार्यांचा सामना करून आपल्या राणीचा किंवा राजाचा झेंडा त्या भागावर रोवतील आणि याचसोबत ते त्या भागाचे रक्षण देखील करतील.

VIRAL VIDEO : सोनाक्षीसाठी अक्षय कुमार बनला मेकअपमन!

===========================================================

VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...