Bigg Boss Marathi 2 : वीणा-शिवमध्ये दुरावा, काय आहे नेमकं कारण?

Bigg Boss Marathi 2 : वीणा-शिवमध्ये दुरावा, काय आहे नेमकं कारण?

घरात एकीकडे टास्क सुरू असताना नेहेमीच चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे वीणा आणि शिव यांच्यात वाद पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल हीना पांचाळ घराबाहेर पडली. आजपासून नवा आठवडा सुरू होणार आहे. हा नवा आठवडा सदस्यांसाठी कसं असेल ? काय काय टास्क रंगतील ? हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस नेहेमीच सदस्यांवर वेगवेगळे टास्क सोपवत असतात. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘बिचुकले की अदालत’ हे कार्य रंगणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले वकिलची भूमिका निभावणार आहेत. या कार्यात बिचुकले  प्रत्येक सदस्यावर काही आरोप लावतील. अभिजीत बिचुकळे यांनी सदस्यांवर लावलेले आरोप त्यांना फेटाळून लावून त्यांची बाजू मांडायची आहे. टास्कमध्ये वाद विवाद तर होणारच. बिचुकले सदस्यांवर कोण कोणते आरोप लावतील ? सदस्य स्वत:ची बाजू काशी मांडतील ? हे बघणे रंजक असणार आहे.

एकीकडे घरात टास्क सुरू असताना नेहेमीच चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे वीणा आणि शिव यांच्यात वाद पाहायला मिळणार आहे. घरामध्ये या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. जिथे वीणा तिथे शिव असे सहसा आपल्याला दिसते. महेश मांजरेकरांनी देखील WEEKEND चा डाव मध्ये वीणा याचा कंटाळा येत नाही का ? आता खेळाकडे लक्ष द्या असे शिवला सांगण्याचा सल्ला दिला. यानंतर या आठवड्यामध्ये दोघांमध्ये काही बदल दिसेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण आज वीणा आणि शिवमध्ये वाद होणार आहे. शिवच्या बोलण्याने वीणा खूप दुखावली आहे आणि तिने तिच्या भावना किशोरीताई जवळ व्यक्त केल्या.

अनुष्कानं शेअर केला बिकिनी फोटो, कमेंट करण्याचा मोह विराटलाही आवरेना

खरंतर दर आठवड्याला या घरामधील समीकरण बदलतात. नाती बदलतात. पण नाती कशी टिकवून ठेवायची हे प्रत्येक सदस्यावर असते. वीणाला शांत आहे हे बघून शिवने विचारले काय झाले ? पण त्यावर वीणाचे म्हणणे होते काहीच नाही. शिव म्हणाला मला सांग काय प्रॉब्लेम आहे ? वीणा त्यावर त्याला म्हणाली आवाज हळू कर माझं खूप डोक दुखत आहे. वीणाच्या अश्या बोलण्याचा शिवला राग आला आणि त्याने रागात वीणाला उत्तर दिले “इतक घाणेरडं अॅटीट्यूड आहे, की मी सेफ झालो त्याचा प्रॉब्लेम आहे ? माहिती नाही”. वीणाला शिवच्या या वाक्याचे वाईट वाटले.

Mission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO

आज वीणा झालेला प्रकार किशोरीताईन सांगणार आहे. किशोरी ताईंचे देखील म्हणणे पडले असं का म्हणाला शिव ? त्यानंतर वीणाने सांगितले महेश सर देखील म्हणाले तू नेहेमी विरुध्द टीमला पाठिंबा देते. मी शिवला पाठिंबा देत होते कारण शिव मागील आठवड्यापासून खूप अस्वस्थ होता. मी प्रत्येक टास्क प्रामाणिकपणे खेळते असे आरोप मी नाही सहन करू शकत, माझ्या मनाला काही गोष्टी खूप लागल्या आहेत. अस असेल तर मी घरी जायला पण तयार आहे पण मी असे आरोप नाही सहन करणार”

Bhool Bhulaiyaa 2 First Look : पोस्टरवरून या हिरोला ओळखणंही झालं कठीण!

==================================================================

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

Published by: Megha Jethe
First published: August 19, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading