Bigg Boss Marathi 2 : ...आणि नेहाला झाले अश्रू अनावर!

Bigg Boss Marathi 2 : ...आणि नेहाला झाले अश्रू अनावर!

जेव्हा बऱ्याच दिवसांनी आपला माणूस अनपेक्षितरीत्या आपल्याला भेटतो तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होऊन बसते.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचा आज ६६ वा दिवस. इतके दिवस आपल्या माणसांपासून दूर रहाणे अवघडच. त्यांच्याशी न बोलता, न भेटता, कुठल्याही प्रकारच संपर्क न ठेवता रहाण्याचा आपण विचार देखील करू शकत नाही पण हे सदस्य मोठ्या धीराने हे करत आहेत. जेव्हा इतक्या दिवसांनी आपला माणूस अनपेक्षितरीत्या आपल्याला भेटतो तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होऊन बसते. असेच काहीसे आज घरातील सदस्यांबाबत होणार आहे. बिग बॉस सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देणार आहेत वा त्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहाला नचिकेत भेटायला येणार आहे. त्याला इतक्या दिवसांनंतर समोर बघून नेहाला अश्रु अनावर झाले.

“सुखा सुखी घेता घास... ठसका लागे, अडके श्वास... जो पाणी होऊनी येई त्यास सखा जिवाचा मानावा” या ओळींनी म्हणत नचिकेतनी घरामध्ये एंट्री केली. आणि सगळेच शांत झाले. नचिकेतने घरामध्ये आल्यावर नेहाला कोणते सल्ले दिले? तिच्याशी तो काय बोलला? त्याने इतर सदस्यांना काय सांगितले? हे आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये कळेलच. इतर सदस्यांना कोण कोण भेटायला आले? त्यांनी यांना काय सल्ले दिले?

शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिग बॉस सदस्यांवर आगळावेगळा टास्क सोपवणार आहेत. ज्यामध्ये सदस्यांना बिग बॉसच्या घोषणेनंतर statue व्हायचे आहे आणि त्यांची रिलीझ ही सूचना होताच रिलीझ व्हायचे आहे. टास्क दरम्यान बर्‍याच गंमती होणार हे नक्की. कारण बिग बॉस कधीही या दोन सूचना देऊ शकतात. पण, या मागचा हेतु काय असावा ? या सूचना येताच सदस्यांना असेल त्या परिस्थितीमध्ये थांबायचे आहे आणि रिलीझ ही सूचना येताच हालचाल करणे अपेक्षित आहे. आता बघूया घरातील सदस्य ही संयमाची आणि अवघड कसोटी कशी यशस्वीरित्या पार पाडतील.

साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी कार्तिक आर्यनची धडपड!

काल अभिजीत केळकर आणि आरोहमध्ये रंगलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अभिजीत केळकरने बाजी मारून १० व्या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. या टास्कमध्ये बरीच वादावादी झाली, भांडण झाली, गैरसमज झाले पण अखेर घरातील सदस्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले. आजच्या टास्कमध्ये काय घडणार ? सदस्यांना बिग बॉस कोणते सरप्राइज देणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

सोनाक्षी सिन्हाला हवाय असा बॉयफ्रेंड, रिलेशनशिपबाबत म्हणते…

================================================================

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

First Published: Jul 31, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading