Bigg Boss Marathi : अजबच! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वधू वर सूचक मंडळ

Bigg Boss Marathi : अजबच! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वधू वर सूचक मंडळ

घरातील दोन सदस्य वीणा आणि शिव यांच्यातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यामध्ये नेमून दिलेली दोन कुटुंबे वधू - वर सूचक मंडळात जाणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : बिग बॉस मराठीच्या घरात सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. आज घरामध्ये बिग बॉस सदस्यांवर लक्झरी बजेट कार्य सोपवणार आहेत. या कार्याचे स्वरूप ऐकताच सदस्यांना खूप गंमत वाटली. बिग बॉस मराठीच्या घरातील दोन सदस्य वीणा आणि शिव यांच्यातील मैत्री सुंदर आणि प्रेरणादायी आहे. दोन्ही सदस्य एकमेकांची काळजी घेतात आणि प्रेमाने एकमेकांशी बोलतात. पण यांच्यात खटके देखील उडतात आणि मग मैत्रीत अडथळा येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यामध्ये नेमून दिलेली दोन कुटुंबे वधू - वर सूचक मंडळात जाणार आहेत. आता या वधू – वर सूचक मंडळात काय घडणार ? कोणाची बाजू वरचढ ठरणार ? कोण जिंकणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

कालच्या भागामध्ये नेहा आणि टीम B मधील सदस्यांमध्ये बराच वाद झाला. नेहा आणि शिवानीने केलेल्या युक्तीची प्रशंसा देखील बिग बॉस यांनी केली. किशोरी आणि नेहा मध्ये फुलं मोजण्यावरून आणि मार्क्स देण्यावरून वाद झाला. शिवानीला सुरु टास्कमध्ये रडू कोसळले, कारण ज्याप्रकारे सदस्य टास्क खेळत होते त्याची भीती वाटणे सहाजिक होते. तर शिवचा हीना आणि आरोह बरोबर वाद झाला. आज या टास्कमध्ये काय होणार ? कोणती टीम बाजी मारणार ? हे कळेलच.

Bigg Boss Marathi च्या घरामध्ये सदस्य बराच काळ एकत्र असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते तयार होते. जे बऱ्याचदा घराबाहेर पडल्यावर देखील तसेच रहाते. असेच नाते विणा आणि शिवमध्ये देखील तयार झाले आहे. त्यांच्यातील मैत्री घरातील सदस्य आणि प्रेक्षकांपासून काही लपलेली नाही. शिव विणासाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतो. काही दिवसांपूर्वी शिवनं मर्डर मिस्ट्री हा टास्क करण्यास नकार दिला कारण, त्यामध्ये विणाचा टॉप नष्ट करायचा होता.

यावरून विकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकरांनी शिवला खडे बोल सुनावले. तर अभिजीत केळकरने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.कधी कधी विणाला मदत करण्याच्या प्रयत्नात विणाचेच नुकसान होईल असे देखील सांगितले. कारण असे झाल्यास ती शिववर अवलंबून आहे असे दिसते. तर शिवचे खेळण्यावर लक्ष कमी झाले आहे असे प्रेक्षकांना देखील दिसत आहे असे म्हणणे पडले. शिवने महेश मांजरेकरांना शब्द दिला कि, या आठवड्यापासून त्याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल.

================================================================

VIDEO : भररस्त्यावर कारने घेतला पेट, अखेर जवानांनी विझवली आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या