Bigg Boss Marathi 2 : घरातील भांडण मिटेना, आरोह आणि शिवमध्ये आता 'या' कारणावरुन वाद

Bigg Boss Marathi 2 : घरातील भांडण मिटेना, आरोह आणि शिवमध्ये आता 'या' कारणावरुन वाद

सध्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य सुरु झाल्यानंतर सदस्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये वाद होण्यासाठी काही मोठ कारण लागतच असे नाही. अगदी छोट्या कारणावरूनही हे वाद घरामध्ये झाले आहेत आणि होतात. सध्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. ज्यामध्ये सदस्यांचे खटके उडायला सुरुवात झाली आहे. काल अभिजीत आरोहला म्हणाला तुला हळूहळू कळेल कोण कसं खेळत ते. तर आज देखील आरोह आणि नेहामध्ये वाद होणार आहे. आरोहचे नेहाला म्हणणे आहे चीटिंग करू नकोस. पण टास्कमध्ये आरोह शिवला अस काय म्हणाला ज्याचा राग शिवला आला आणि त्याने आरोहला जाब विचारला. इतकेच नसून हीनाबरोबर देखील शिवची बाचाबाची होताना दिसणार आहे.

संजू सिनेमातल्या '300 मुलींसोबत सेक्स'चा डायलॉग तुम्हाला चालतो, शाहिदची सटकली

आरोहने शिवबद्दल रोडीज कार्यक्रमाला धरून एक वक्तव्य केले ज्याचा राग शिवला आला आणि तो आरोह म्हणाला, जर आता रोडीज जर दाखवला ना तुला तर तू उभा पण नाही रहाणार इथे. मी प्रेमाने घेतो आहे, टास्क संपला कि गोष्ट संपली. मी काही वैयक्तिक बोलतो का तुझ्याशी? मी टास्कनंतर सगळ मिटवतो. जर तुला रोडीज काढायचं असेल तर मी तशी उत्तर देऊ का? आरोह त्यावर म्हणाला, तुला जशी उत्तर द्यायची तशी दे. शिवचे म्हणणे पडले तुला हे मिटवायचे आहे कि वाढवायचे आहे? मी त्या भाषेमध्ये बोलू शकतो. तुला जर रोडीज काढायचे आहे तर मी दाखवू का तुला? त्यावर आरोह म्हणाला, “काय दाखवणार आहेस तू ” ? आणि वाद वाढला. याशिवाय शिव आणि हीनामध्ये देखील आज टास्कवरून वाद होणार आहे. “तुम्हांला खेळायला नाही येत तर गप बसं, तू मला नको सांगूस”.

धक्कादायक ! डोक्याला गंभीर इजा झाल्यानं 6 महिने झाला होता मेमरी लॉस - दिशा पाटनी

हीनाचा शिवला सल्ला

शिवचा आवाज चढला हीनाला त्याने विचारले “तू शिकवशील का आता मला”? त्यावर हीनाचे म्हणणे होते, “तुम्हांला हीच भाषा समजते”. शिवचे म्हणणे आहे, “तू उत्तर देऊन दाखव, त्या भाषेत मी उत्तर देईन.

याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आरोह वेलणकर वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आला आणि आता त्याचा घरातला हा पहिलाच टास्क असून या टास्कमध्ये आज त्याचा वाद नेहाशी होणार आहे. किशोरी आणि नेहा आपापल्या टीमच्या मुकादम आहेत. बझर वाजल्यानंतर विरोधी टीमने लावलेली फुलं मोजून त्यांची संख्या बोर्डवर लिहायची आहे आणि याचवेळेस नेहाचे म्हणणे आहे ज्या फुलांच्या कंड्या तुटल्या आहेत ती फुलं मी नाही मोजणार, कारण इतकी लहान काडी आमची देखील काल मोजली नव्हती. त्यावर आरोह म्हणाला काहीच संबंध नाहीये. नेहा चिडायचे नाही आणि चीटिंग नाही करायची. त्यावर शिवानीचे म्हणणे होते बरोबर आहे संचालिकेचा नियम आहे. किशोरीचे म्हणणे आहे मी आजू फुलं मोजली नाही आहे थांब. हीनाने देखील सांगितले तिला हात लावायला देऊ नका, तू काल करत असताना कोणीच काही बोले नाही नेहा”.

मुलगी जन्मल्यानंतर समीरा रेड्डीची भावुक पोस्ट, ब्रेस्टफिडिंगबद्दल म्हणाली...

या सगळ्या वादावर नेहाने “मी मोजणारच नाही, आणि अप्रूव्ह पण नाही करणार”. असे सांगितले. आरोहचा पारा हा म्हणण्यावर चढला आणि तो म्हणाला त्याचा संबंधच नाहीये नेहा. तुझ्यावर काही नाहीये. नेहाचे म्हणणे होते, मी विरुध्द टीमचा मुकादम आहे मी जे ठरवणार ते फाईनल. आणि वाद वाढतच गेला.

=================================================================

घरातूनच करा आता पाकमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक', पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 03:13 PM IST

ताज्या बातम्या