Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi:जयची चुगली ऐकून भडकली गायत्री! मैत्रीत पुन्हा राडा

Bigg Boss Marathi:जयची चुगली ऐकून भडकली गायत्री! मैत्रीत पुन्हा राडा

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss 15) या शो ने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या शो चे केवळ ३ आठवडे शिल्लक आहेत. अर्थातच ग्रँड फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे सर्वजण आपलं स्थान पक्क कण्यासाठी धडपड करत आहे. आणि यातूनच घरातील स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 5 डिसेंबर-   'बिग बॉस मराठी'   (Bigg Boss 15)  या शो ने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या शो चे केवळ ३ आठवडे शिल्लक आहेत. अर्थातच ग्रँड फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे सर्वजण आपलं स्थान पक्क कण्यासाठी धडपड करत आहे. आणि यातूनच घरातील स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसून येत आहे. नुकताच बिग बॉसच्या चावडीमध्ये एका चाहत्याने गायत्रीला   (Gayatri)  जयची   (Jay)  चुगली पोहोचवली आहे. पाहूया ती नेमकी काय आहे. 'बिग बॉस' हा शो फारच लोकप्रिय ठरत आहे. शोमध्ये दररोज येणारे ट्विस्ट अँड टर्न्स चाहत्यांना खिळवून ठेवत आहेत. आठवडाभर तर प्रेक्षक बिग बॉस मराठी पाहतातच. परंतु विकेंड अर्थातच बी बॉसची चावडी पाहण्यासाठी फारच आतुर असतात. कारण या दोन दिवसात, होस्ट महेश मांजरेकर चांगल्या स्पर्धकांचं कौतुक करतात तर चुकीच्या पद्धतीने खेळलेल्या स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेतात. त्यामुळे लोकांना शनिवार आणि रविवार बी बॉस मराठी पाहणं फारच औत्सुक्याचं वाटतं.काल बिग बॉसच्या चावडीचा या आठवड्यातील पहिला दिवस होता अर्थातच शनिवार होता. यामध्ये महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना चांगलाच झापला तर मीनलसारख्या स्पर्धकाचं कौतुकही केलं. नुकताच बिग बॉस मराठीच्या चावडीच्या एक नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो फारच इंटरेस्टिंग आहे. कारण यामध्ये एका चाहत्याने गायत्री जवळ जयची चुगली केली आहे. जर आठवड्याला काही स्पर्धकांना त्यांच्या चाहत्यांकडून आलेल्या काही चुगल्या सांगितल्या जातात. त्यामुळे त्यांना आपला पुढील खेळ खेळण्यास मदत होते. दरम्यान आज गायत्रीसाठी चुगली आली आहे. यामध्ये गायत्रीच्या एका चाहत्याने तिला जय, मीरा आणि उत्कर्ष यांच्यातील संभाषण सांगितलं आहे. यावेळी त्याने सांगितलं कि, 'जय उत्कर्ष आणि मीराला म्हणत होता, कि आपण चुकीच्या माणसात गुंतवणूक केली. हीच गुंतवणूक जर आपण विशालमध्ये केली असती. तर तो निदान आपल्यासाठी खेळला तर असता. अशी ही चुगली होती.
  गायत्री चुगली बूथमधून बाहेर येत, सर्वांना ही चुगली सांगते. त्यावर ती जयचे आभार मानते. मात्र या सर्व संभाषणाबद्दल जयच्या चेहऱ्यावर थोडासाही पश्चताप किंवा काही दिसत नाही. तो आदी निवांत बसून असतो. त्यांनतर विशाल म्हणतो, तुला माझ्यात गुंतवणूक करायची अजिबात गरज नाही. कारण मी टास्क खेळताना जर तुझ्या टीममध्ये असेल तर नक्कीच चांगलं खेळणार टीमसाठी. पण समोरच्या टीममध्ये असें तर मी त्यासाठी टीमसाठी लॉयल खेळणार तेव्हा तुझी गुंतवणूकपण कामी येणार नाही. त्यांनतर गायत्री म्हणते, मी ज्या माणसाबद्दल नेहमी फक्त आणि फक्त चांगलं बोलते त्या माणसाने माझ्याबद्दल असं बोलावं हे खूपच दुःखद आहे. याच्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या