मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'स्वतःचे फोटो टाकत राहा नाहीतर हरवून जाण्याची भीती दाखवली जाते' मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

'स्वतःचे फोटो टाकत राहा नाहीतर हरवून जाण्याची भीती दाखवली जाते' मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

हल्ली सोशल मीडियावर सेलेब्सचा वावर वाढला आहे

हल्ली सोशल मीडियावर सेलेब्सचा वावर वाढला आहे

सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसतात. यामुळं काही कलाकार नेहमी चर्चेत राहतात. पण यामुळचं कामं मिळत राहतात असा एक गोड गैरसमज कलासृष्टीत रुळला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च- हल्ली सोशल मीडियावर सेलेब्सचा वावर वाढला आहे. हे एकमेव माध्यम आहे, ज्यातून चाहत्यांशी कनेक्ट राहता येते. सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसतात. यामुळं काही कलाकार नेहमी चर्चेत राहतात. पण यामुळचं कामं मिळत राहतात असा एक गोड गैरसमज कलासृष्टीत रुळला आहे. त्याचमुळे अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाशी जोडली गेली आहेत. तर काही कलाकार यापासून स्वताला लांब ठेवताना दिसतात. कारण अभिनय उत्तम असेल तर काम नक्की मिळते या मतावर आजही अनेकजण ठाम आहेत. त्याचमुळे अनेक कलाकार पण कलाकारांचे वाढते प्रमाण आणि मिळणाऱ्या संधी देखील खूप मोठ्या असल्याने हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरले आहे. सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं यासंबंधीच एक पोस्ट केली आहे. या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून यशश्री मासुरकर आहे. यशश्री मासुरकर नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात दिसली होती. या शोमुळे यशश्री चांगलीच चर्चेत राहिली होती. मात्र जशी ती शोमधून बाहेर पडली तसा तिच्याकडे कुठलाही नवीन प्रोजेक्ट चालून आला नाही. दरम्यान या सीजनचे बरेचसे सेलिब्रिटी एकमेकांना भेटताना पाहायला मिळाले. मात्र यशश्री कोणाच्याही संपर्कात दिसली नाही. तिनं नुकतीच एक पोस्ट केली आहे. सोबत काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

वाचा-अरुंधतीच्या समोर उभं राहिलं नवं आव्हान; दुःखात बुडालेल्या यशला कसं सावरणार आई?

यशश्री मासुरकरनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,बरेच दिवस झाले फक्त स्वत:चे फोटोज पोस्ट करतेय…खरं तर ही काळाची गरज बनली आहे…स्वतःला सतत पुढे करत राहणं म्हणजे स्वतःचीच ** करत राहणं…गरजेचं आहे…नाहीतर गर्दीत कुठेतरी हरवून जाल अशी भिती दाखवली जाते, काही अंशी तसं घडतही…मग गरज नसताना उगाचच दिसत रहा…चर्चेत रहा…मला हे फारसं जमत नाही…. इन्स्टाग्राम वर पण हेच…स्वतःचे फोटो पोस्ट करायला सगळ्यांच आवडतं पण आपण कधी ह्या चक्रात अडकून जातो ते कळतही नाही म्हणून अधुन मधून स्वतःतून निघून आसपास बघणं गरजेचं आहे आणि ते तेव्हाच घडतं जेव्हा आतल्या गोंधळाला शांत करता येतं! तिच्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

यशश्री यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनमध्ये दिसली होती. यंदाच्या सीजना विजेता अभिनेता अक्षय केळकर झाला. आता चौथ्या सीजन नंतर चाहत्यांना पाचवा सीजन कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. शिवाय यंदाच्या सीजनमधील अनेक कलाकार नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर काही सेलेब्स प्रचंड सक्रीय असलेले पाहायला मिळातात. काही जण सोशल मीडियाचा वापर त्यांच्या कामासाठी करतात तर काही त्यांच्या मनोरंजनासाठी करताना दिसतात. सध्या रीलचा जमाना आहे. विविध ट्रेडवर अनेक कलाकार त्यांचे रील बनवताना दिसतात. यामुळं सोशल मीडियावर सक्रीय असलेले सेलेब्स नेहमी चर्चेत राहतात.

First published:
top videos

    Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment