मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Insta Live दरम्यान घडलं असं काही, विशाल निकमला मागावी लागली सोनाली पाटीलची माफी

Insta Live दरम्यान घडलं असं काही, विशाल निकमला मागावी लागली सोनाली पाटीलची माफी

 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीजनची 'B टीम' अर्थातच मीनल शाह,विकास पाटील, विशाल निकम आणि सोनाली पाटील यांनी लाईव्ह येत चाहत्यांशी गप्पा मारल्या.

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीजनची 'B टीम' अर्थातच मीनल शाह,विकास पाटील, विशाल निकम आणि सोनाली पाटील यांनी लाईव्ह येत चाहत्यांशी गप्पा मारल्या.

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीजनची 'B टीम' अर्थातच मीनल शाह,विकास पाटील, विशाल निकम आणि सोनाली पाटील यांनी लाईव्ह येत चाहत्यांशी गप्पा मारल्या.

  मुंबई, 9 ऑगस्ट-   नुकतंच सर्वांनी मोठ्या उत्साहात 'फ्रेंडशिप डे' साजरा केला. भेटीगाठी, सेलिब्रेशन,गिफ्ट्स आणि लाईव्हच्या माध्यमातून अनेकांनी आपलं बॉन्डिंग शेअर केलं. यामध्ये बिग बॉस मराठीचे स्पर्धकसुद्धा मागे नाहीत. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीजनची 'B टीम' अर्थातच मीनल शाह,विकास पाटील, विशाल निकम आणि सोनाली पाटील यांनी लाईव्ह येत चाहत्यांशी गप्पा मारल्या. परंतु मध्येच असं काही घडलं की त्यामुळे विशालने सोनालीची माफीदेखील मागितली आहे. 'बिग बॉस मराठी' चा तिसरा सीजन प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते. शोमुळे या सर्व स्पर्धकांना एक खास ओळखसुद्धा मिळाली आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. शोमध्ये अनेक राडे, मैत्री आणि प्रेम पाहायला मिळालं होतं. दरम्यान शोमध्ये विशाल आणि सोनालीची हटके केमिस्ट्री आणि त्यांनतर त्यांच्यात झालेला वादसुद्धा प्रचंड चर्चेत आला होता. या सर्व प्रकारानंतर सोनाली आणि विशाल पुन्हा एकत्र कधी येणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून होती. चाहत्यांची ही इच्छा काही प्रमाणात पूर्णदेखील झाली आहे. नुकतंच फ्रेंडशिप डेनिमित्त सोनाली पाटील आणि विशाल निकम एकत्र आले होते. मात्र ते इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांसमोर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मीनल शाह आणि विकास पाटीलदेखील होते. या सर्वांच्या छान अशा गप्पा सुरु होत्या. मात्र मध्येच असं काही झालं की सोनाली पाटीलने लाईव्हमधून एक्झिट घेतली. आणि त्यांनतर विशाल पाटीलने तिला छान असं पोस्ट लिहत सॉरीदेखील म्हटलं.
  (हे वाचा:Manasi Naik: चक्क नवऱ्याला उचलून पोज द्यायला गेली मानसी नाईक, नंतर झाली अशी फजिती, PHOTO व्हायरल ) वास्तविक सोनाली पाटील आपल्या नेहमीच्या बिनधास्त अंदाजात बोलत होती. दरम्यान सोनालीने ऑलम्पिकचं एक ब्रीदवाक्य आहे ते बिग बॉसच्या घरालादेखील लागू होतं. कारण या घरात जिंकणं नव्हे तर स्वतःला टिकवून ठेवणं कितपत कठीण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी मित्रांमध्ये एकमेकांची मस्करी होतच असते. तसंच विशाल आणि विकासने सोनालीची मस्करी केली आणि त्यांनतर तिने रागात लाईव्हमधून एक्झिट घेतली. परंतु हा सर्व प्रकार मजेशीर असल्याने विशालने सोनालीला सॉरी म्हणत तिची माफी मागितली आहे. प्रेक्षकांना मात्र त्यांची ही केमिस्ट्री आजही प्रचंड पसंत पडत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या