Home /News /entertainment /

'भाऊ हा शब्द उलटा वाचला की...' विशाल निकमची भावासाठी खास पोस्ट अन् व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला रावडी स्वॅग

'भाऊ हा शब्द उलटा वाचला की...' विशाल निकमची भावासाठी खास पोस्ट अन् व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला रावडी स्वॅग

विशाल निकमने त्याच्या भावासोबत एक रावडी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ तर रावडी आहेच पण त्याला दिलेली कप्शन देखील रावडी आहे. सध्या या कॅप्शनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

  मुंबई, 2 जून - 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Mrathi) चा तिसरा सीजन (Season 3) प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते. शोमुळे या सर्व स्पर्धकांना एक नवी ओळखसुद्धा मिळाली आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. शोमध्ये अनेक राडे, मैत्री आणि प्रेम पाहायला मिळालं होतं. या शोचा महाविजेता विशाल निकम ठरला. विशाल निकम (VISHHAL NIKAM)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. कामाबद्दल असेल किंवा पर्सनल आयुष्याबद्दल काहींना काही शेअर करत असतो. नुकताच त्यांने त्याच्या भावासोबत एक रावडी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ तर रावडी आहेच पण त्याला दिलेली कप्शन देखील रावडी आहे. सध्या या कॅप्शनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. विशाल निकमनं इन्स्टावर त्याच्या भावासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही भाऊ निळ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसत आहेत. दोघांचा यात वेगळाचा स्वॅग पाहायला मिळत आहेत. विशालनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, भाऊ हा शब्द उलटा वाचला की "उभा" जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ ! वाचा-मुघलांविषयी माहिती हवीच; पण आपल्या राजांबद्दल मोजकी माहिती का?अक्षय कुमारचा सवाल विशाल निकमच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी देखील प्रेम व्यक्त केलं आहे. एकानं म्हटलं आहे की, भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची..!!❣️👬 तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, भाऊ म्हणजेच सर्व काही ज्याच्याशी आपण सर्व काही हक्काने सांगू शकतो असा एक अनमोल साथी ❤️👬
  विशाल निकम आणि विकास पाटील यांची जोडी देखील बिग बॉस मराठीच्या घरात मित्रांपेक्षा दोना भावांची म्हणून जास्त ओळखली जायची. यांच्या बंधू प्रेमाची नेहमीच शोमध्ये चर्चा झाली. घरातून बाहेर आल्यानंतर हे प्रेम आहे तसच असल्याचे दिसून आलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या