Home /News /entertainment /

'हळद लागली, हळद लागली...' विशाल निकमची नवीन पोस्ट चर्चेत

'हळद लागली, हळद लागली...' विशाल निकमची नवीन पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठी फेम विशाल निकमने नुकतीच हळद लागली, हळद लागली...म्हणत एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

  मुंबई, 6 जून- बिग बॉस मराठी तीन(bigg boss marathi 3) पर्वाचा महाविजेता विशाल निकम (vishal nikam ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीचा चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतीच त्याने हळद लागली, हळद लागली...म्हणत एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. विशाल निकमने त्याच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो हळदी सोहळ्याचे आहेत. फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली! 💛 विशाल निकमच्या घरचं लग्न आहे. त्याच्या भावाची हळद आहे. त्यासाठीच विशालनं ही पोस्ट केली आहे. यापूर्वी देखील विशालनं त्याच्या भावासोबत एक रावडी व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामुळ तो चर्चेत आला होता. 'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल विशाल निकमने त्याच्या भावाच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत मात्र चर्चा त्याच्या लग्नाची रंगली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत विशाल निकमला देखील लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, विशाल भावा आम्हाला पण वहिनी पाहिजे... गोरी गोरी पान, हळवि, सालस, आपल्या माणसांना सांभाळून घेणारी...राम कृष्ण हरी लग्नात ती सुंदर परी भेटावी... स्वामी चरणी प्रार्थना.. 🙏🙏 तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,उरका तुमचं पण यंदा 😍😍.
  विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरात पोहचला. या मालिकेने त्याला
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या