Home /News /entertainment /

Bigg Boss फेम उत्कर्ष शिंदेने लहान पण देगा देवा म्हणत शेअर केले पुतण्यांसोबतचे क्यूटवाले फोटो

Bigg Boss फेम उत्कर्ष शिंदेने लहान पण देगा देवा म्हणत शेअर केले पुतण्यांसोबतचे क्यूटवाले फोटो

उत्कर्षने नुकतीच त्याच्या भावाच्या दोन मुलांसाठी म्हणजे पुतण्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे शिवाय त्यांच्यासोबतचं काही फोटो शेअर केले आहेत.

  मुंबई, 13 जून - बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3 ) फेम अभिनेता, गायक, डॉक्टर उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde ) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती शेअर करत असतो. शिवाय त्याच्या भावांच्या मुलांसोबत देखील काही भन्नाट व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असतो. उत्कर्षने नुकतीच त्याच्या भावाच्या दोन मुलांसाठी म्हणजे पुतण्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे शिवाय त्यांच्यासोबतचं काही फोटो शेअर केले आहेत. उत्कर्ष शिंदेने त्याच्या पुतण्यासोबतचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की,भावांची मुलं माझे लाडके पुतणे (आल्हाद आणि आलाप ,अंतरा )म्हणजे माझे जिवलग मित्र. मी त्यांचा काका असून पण त्यांच्या सोबत लहान होऊन त्यांची फ्रिक्वेंसी मॅच करण्यात त्यांच्या सोबत त्यांच्या सारख वागण्यात जी मज्जा असते... ती दुसरी कशातच नाही #लहानपणदेगादेवा.त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील हार्ट ईमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. वाचा-'आता मागे न पाहता पुढे जाणे गरजेचे...' प्राजक्ता माळीची नवी पोस्ट कशाबद्दल? आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष (Utkarsh Shinde) आणि आदर्श (Aadarsh Shinde) ही तीन मुले आहेत. उत्कर्ष आणि आदर्श शिंदे संगीत क्षेत्रात नशीब आजमावताना दिसतात. तर हर्षद शिंदे हा ऍनिमेशन इंजिनिअर आहे. अलाप हा हर्षद शिंदेचा मुलगा आहे. तर आदर्शला एक मुलगी आहे.
  उत्कर्ष शिंदेने त्याचे डॉक्टरकीचे शिक्षण पुणे, मुंबई, लंडन आणि अमेरिकेत घेतले आहे. उत्कर्ष एमडी आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन येथे तर पीजीडीईएस अमेरिकेत केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उत्कर्ष हा गायक, संगीतकार इतकेच नाही तर गीतकार आणि अभिनेता देखील आहे. डॉ. उत्कर्ष शिंदेच्या कामाच्या बाबतीत सांगायचे तर त्याने 'हाक मारतेय कोल्हापूर', 'गो करोना, करोना गो', 'से कोव्हिड योद्धा', 'हळदीचा सोहळा' ही गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे त्याने 'महामानवाची गाथा' हे गाणे लिहिले. याशिवाय त्याने हे गाणे भाऊ आदर्शबरोबर गायले आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव गाठीशी असलेला डॉ. उत्कर्ष शिंदे बिग बॉस मराठी 3 च्या घरात देखील आपल्या खेळीनं सर्वांचे मन जिंकले. या घऱात त्याला ऑलराऊंडर ही ओळख मिळाली.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या