Home /News /entertainment /

'जितकं प्रेम नागपूरकरांना..'; उत्कर्ष शिंदेची नवी पोस्ट नेमकी कशाबाबत?

'जितकं प्रेम नागपूरकरांना..'; उत्कर्ष शिंदेची नवी पोस्ट नेमकी कशाबाबत?

'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) यंदाचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला. या शोमधील स्पर्धकांनासुद्धा एक खास ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे उत्कर्ष शिंदे होय. अभिनेता, गायक, डॉक्टर उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde ) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो.

पुढे वाचा ...
  मुंबई, 18 जून-   'बिग बॉस मराठी'चा   (Bigg Boss Marathi)  यंदाचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला. या शोमधील स्पर्धकांनासुद्धा एक खास ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे उत्कर्ष शिंदे होय. अभिनेता, गायक, डॉक्टर उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde ) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच तो आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी नागपूरला गेला आहे. आपल्या या प्रवासाची एक झलक त्याने चाहत्यांसोबत शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. उत्कर्ष शिंदे 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. या शोमध्ये त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. टास्क खेळण्याची चतुराई आणि बुद्धी कौशल्य यामुळे तो चांगलाच चर्चेत होता. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे तो या शोमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत टिकून होता. शो संपल्यानंतरसुद्धा तो सतत चर्चेत आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतो. तो सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. आजही त्याने असंच काहीसं केलं आहे.
  उत्कर्ष शिंदे पोस्ट- (नागपूर )महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर.मोठ्या मनाची माणसं असणारं शहर.काही दिवसांसाठी नागपूर मध्ये शूटिंग साठी आलोय .आणि एअरपोर्ट ते हॉटेल पर्यंत फक्त चाहते आणि चाहतेच .नागपूर नेहमीच खूप प्रेम देत .पण आज इकडच्या मात्तीत इकडच्या कलाकारानं सोबत काम करण्याचा योग लाभतोय ह्याचा वेगळा आनंद आहे .कामातून वेळ काढून भंडारा मधील बुद्धविहार,नागपूर मधील दीक्षाभूमी ,ड्रॅगन पॅलेस ,ताजुद्दिन बाबा दर्गा ते मोमीन पुरा सर्वी कडे जाणारच आहे . जितक प्रेम नागपूरकरांना देता येईल तितका देणार आणि दुपटीने प्रेम आशीर्वाद नागपूरकरां कडून घेऊन जाणार''. (हे वाचा:PHOTOS: शूटिंगमधून वेळ काढून मराठमोळी अभिनेत्री घेतेय सुट्टीची मजा; निसर्गाच्या सानिध्यात शोधतेय आनंद ) उत्कर्ष शिंदेने त्याचे डॉक्टरकीचे शिक्षण पुणे, मुंबई, लंडन आणि अमेरिकेत घेतले आहे. उत्कर्ष एमडी आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन येथे तर पीजीडीईएस अमेरिकेत केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उत्कर्ष हा गायक, संगीतकारइतकंच नव्हे तर गीतकार आणि अभिनेतादेखील आहे.डॉ. उत्कर्ष शिंदेच्या कामाच्या बाबतीत सांगायचे तर त्याने 'हाक मारतेय कोल्हापूर', 'गो करोना, करोना गो', 'से कोव्हिड योद्धा', 'हळदीचा सोहळा' ही गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे त्याने 'महामानवाची गाथा' हे गाणे लिहिले आहे. याशिवाय त्याने हे गाणे भाऊ आदर्शबरोबर गायले आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या