मुंबई, 5 एप्रिल- बिग बॉस मराठीमुळं ( bigg boss marathi 3 ) महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली कोल्हापूरची मुलगी अभिनेत्री सोनाली पाटील हिचा आज, 5 मे रोजी वाढदिवस आहे. या बिग बॉस गर्लवर (sonali patil birthday) चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या सोनालीचं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन सुरू आहे. यानिमित्तच ती एका ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली असता तिला तिथं तिचा एक छोटावाला फॅन भेटला. सोनालीच्या या छोट्या फॅनसोबतचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोनाली पाटीलनं तिच्या इन्स्टावर तिच्या छोट्या फॅनसह एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिनं म्हटलं आहे की, याला फक्त आणि फक्त चॉकलेट खायचं आहे म्हणुन आला आहे बाकी birthday wish नाही करायचं आहे But shoooshweeet i don't know what's your name but तरीपण#lailoveyou
वाचा-मंदिरा बेदीने का कापले होते आपले लांबलचक केस? 12 वर्षानंतर केला मोठा खुलासा
सोनाली या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते आहे की, हा माझा छोटा फॅन आहे. मी इकडं आले आणि हा मला भेटला. सोनाली त्याला चॉकलेट देताना दिसत आहे. असा एकादा फॅन आपल्या बर्थडेला भेटणं याहून मोठ गिफ्ट आणि सरप्राईज काहीज आसु शकत नाही. तिच्या या छोट्या फॅनचं चाहत्यांने देखील कौतुक केलं आहे. शिवाय सोनालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
वाचाआदिती राव हैदरीने खरेदी केली नवी कार, किंमत कोटींच्या घरात
सोनाली पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ व फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय तिचे मीनल शाहसोबत भन्नाट रील्स देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सोनालीचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे सोनाली देखील कधी कुठेही लगेच आपल्या चाहत्यांमध्ये मिक्स होऊन चाहते. त्यामुळचं खरं तर तिचा आज एवढा मोठा चाहता वर्ग आहे.
सोनाली पाटीलने मराठी बिग बॉस सीझन 3 मधे आपली भाषा, व्यक्तिमत्व, आणि सौंदर्याच्या बळावर अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सोनाली बिग बॉस मराठीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची आहे. सोनाली शॉर्ट व्हिडिओ साठी खूप प्रसिध्द आहे. तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीनं छोट्या मोठ्या भूमिका साकारत आता मराठी मनोरंजन विश्वात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली पाटीलने 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.