Home /News /entertainment /

'लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी लोकं आयुष्यात कधीच..' सोनाली पाटीलचं भन्नाट Reel Viral

'लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी लोकं आयुष्यात कधीच..' सोनाली पाटीलचं भन्नाट Reel Viral

नुकतचं सोनाली पाटीलन एक भन्नाट असं इन्स्टा रील्स शेअर केलं आहे. हे रील्स दुसरं तिसरं कशावर नाही तर लग्नाच्या जेवणाचाय पंगतीतलं आहे.

  मुंबई, 1 जून : बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3) फेम अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil ) इन्स्टावर चांगलीच सक्रीय दिसते. तिचे विविध फोटोशूट असतील किंवा तिचे रील्स नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. नुकतचं सोनाली पाटीलन एक भन्नाट असं इन्स्टा रील्स शेअर केलं आहे. हे रील्स दुसरं तिसरं कशावर नाही तर लग्नाच्या जेवणाचाय पंगतीतलं आहे. सोनाली मस्त लग्नात भातावर ताव मारताना दिसत आहे.तिच हे लेटेस्ट रील्स सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. सोनाली पाटीलनं इन्स्टावर एक रील्स शेअर केला आहे. यामध्ये ती लग्नाच्या पंगतीत मस्त मसाले भात, पूरी, भाजी, पापड असा ताव मारताना दिसत आहे. काही मंडळी लग्न लागतय कधी आणि जेवणाच्या ताटावर बसतोय कधी अशी वाटच पाहत असतात. सोनाली पाटीलचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. सोनाली खाण्यात इतकी मग्न झाली आहे की..तिला जेवणाशिवाय काहीच दिसत नाही असचं दिसत आहे. विशेष या रील्समध्ये बॅग्राऊंडला एक भन्नाट आवाज कानावर पडतो आहे. तो म्हणजे की, लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी लोकं आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत..तिच्या या भन्नाट रील्सवर कमेंट देखील भन्नाट आल्या आहेत. वाचा-'सगळीकडे शेपूट बरोबर ' प्राजक्ताची भाची आली आत्तूच्या शहरी अन् करतेय धमाल मस्ती सोनालीच्या या रील्सवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, होय आम्ही लग्नासाठी जेवढं उत्साही नसतो तेवढ जेवणावर ठपून असतो. तर दुसऱ्याने गंमतीनं म्हटलं आहे की, बापरे किती हळू जेवतेस.. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, सोनाली खायला लईच पक्की आहे..अशा अनेक भन्नाट कमेंट तिच्या या व्हिडिओवर आल्या आहेत.
  सोनाली पाटीलने मराठी बिग बॉस सीझन 3 मधे आपली भाषा, व्यक्तिमत्व, आणि सौंदर्याच्या बळावर अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सोनाली बिग बॉस मराठीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची आहे. वाचा-सगळ्यांची झालीय बत्ती गुल कारण 'टाईमपास 3'च्या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज सोनाली शॉर्ट व्हिडिओ साठी खूप प्रसिध्द आहे. तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीनं छोट्या मोठ्या भूमिका साकारत आता मराठी मनोरंजन विश्वात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली पाटीलने 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या