Home /News /entertainment /

'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघला मिळाला नवा प्रोजेक्ट! दिसणार 'या' भूमिकेत

'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघला मिळाला नवा प्रोजेक्ट! दिसणार 'या' भूमिकेत

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर स्पर्धकांना इतर काही प्रोजेक्टस करण्याची संधी मिळत आहे. उत्कर्ष, जय, मीरानंतर आता या यादीमध्ये स्नेहा वाघचा (Sneha Wagh) समावेश झाला आहे.

  मुंबई, 14 जानेवारी-   'बिग बॉस मराठी'   (Bigg Boss Marathi)  चा तिसरा सीजन   (Season 3)   प्रचंड गाजला. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना प्रचंड मसाला पाहायला मिळाला. कधी राडे तर कधी प्रेम, कधी मैत्री तर कधी शत्रुत्व यासर्व संमिश्र गोष्टींनी बिग बॉस मराठीचं घर दणाणून सोडलं होतं. या शोमधील स्पर्धकांनासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळेच शो संपल्यानंतरसुद्धा ते सतत चर्चेत आहेत. इतकंच नव्हे तर बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर त्यांना इतर काही प्रोजेक्टस करण्याची संधी मिळत आहे. उत्कर्ष, जय, मीरानंतर आता या यादीमध्ये स्नेहा वाघचा   (Sneha Wagh)  समावेश झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री आणि बिग बॉस 3 ची स्पर्धक स्नेहा वाघला एक नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. रिपोर्टनुसार, स्नेहा लवकरच एका शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार, या नव्या इनिंगबद्दल बोलताना स्नेहा वाघनं म्हटलं आहे, 'मला मराठी मनोरंजन सृष्टीत कमबॅक करायचंच होतं. परंतु मी एका चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत होते. आणि ती संधी आता मला मिळाली आहे'. स्नेहा कोणत्या शोमधून मराठी सृष्टीत कमबॅक करणार याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु स्नेहा वाघकंगे चाहते ही बातमी ऐकून फारच आनंदात असणार हे नक्की.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  बिग बॉस मराठीमुळे या कलाकार स्पर्धकांना फारच लोकप्रियता मिळाली आहे. या स्पर्धकांना संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळेच आज शो संपल्यानंतरसुद्धा या स्पर्धकांची क्रेझ कायम आहे. यापूर्वी उत्कर्ष शिंदेला एका शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेची ऑफर मिळाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जय आणि मीरा आनंद शिंदे यांच्या एका व्हिडीओ सॉन्गमध्ये झळकणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यांनतर आता स्नेहा वाघलासुद्धा नवा प्रोजेक्ट मिळाल्याचं समोर आलं आहे. बिग बॉमधील स्पर्धकांना चाहते पुन्हा नव्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. (हे वाचा:किचन कल्लाकार' मध्ये संकर्षणची जागा घेणार श्रेया बुगडे! काय आहे कारण? ) स्नेहा वाघबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात तिला फारच प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेत्रीचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. तिचा एक्स पती आदेश दारव्हेकरसुद्धा या शोमध्ये स्पर्धक होता. परंतु बिग बॉसच्या घरात स्नेहा आणि जयमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री फार आवडली होती. तर नेटकऱ्यांनी स्नेहाला प्रचंड ट्रोलदेखील केलं होतं. स्नेहा तब्बल दोन महिन्यानंतर घरातून बाहेर पडली. परंतु तिनं गेस्ट अपियरन्स करत जयवर आपला अवपर करून घेतल्याचा आपल्या भावनांशी खेळल्याचा आरोप करत सर्वांनाच चकित केलं होतं. आता या दोघांमध्ये पुन्हा सगळं ठीक होणार की हे नातं संपणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. स्नेहा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती सतत आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या